Student Of The Year 2 Trailer: टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारियाला मिळतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:37 PM2019-04-12T19:37:37+5:302019-04-12T19:50:03+5:30

स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असून तो या चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार आहे.

स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे.

स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात इंटर कॉलेज डिग्निटी कॉम्पटिशनने होते.

हा ट्रेलर लाँच झाल्यापासून या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या लूकची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली आहे.

कॉलेजमधील धमाल मस्तीवर हा चित्रपट आधारित असल्याचे हा ट्रेलर पाहूनच लक्षात येत आहे.

अनन्या पांडेचा हा पहिला चित्रपट असून ती अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीपासूनच सोशल मीडियावर तिची प्रचंड चर्चा आहे.

तारा सुतारियाचा देखील हा पहिलाच चित्रपट असून ट्रेलरमध्ये तिचा खूप छान लूक पाहायला मिळत आहे.

अनन्या पांडेला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या चित्रपटाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

या ट्रेलरमधील टायगर श्रॉफचा डॅशिंग अवतार प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.