‘सिम्बा’च्या ट्रेलरमध्ये भाव खावून गेली सारा अली खान, पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 03:18 PM2018-12-03T15:18:12+5:302018-12-03T15:24:57+5:30

रणवीर सिंग आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सिम्बा’चा ट्रेलर आज लॉन्च झाला. ‘सिम्बा’चा हा धमाकेदार ट्रेलर चाहत्यांना भावला आहे. ट्रेलर पाहून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हेच कारण आहे ेकी, उण्यापुºया तासाभरात साडे चार लाख लोकांनी ट्रेलर पाहिला. ट्रेलरमध्ये रणवीरला पाहणे इंटरेस्टिंग आहे. पण त्याहीपेक्षा साराला पाहणे आणखी इंटरेस्टिंग आहे.

ट्रेलरमध्ये सारा केवळ एक डायलॉग म्हणताना दिसतेय. पण असे असले तरी संपूर्ण ट्रेलरमध्ये ती अनेकदा दिसते. तिची ही झलक इतकी झकास आहे की, तुम्ही ती वारंवार पाहाल.

रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात सारा रणवीर सिंगसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

सारा आणि रणवीरची केमिस्ट्री अफलातून आहे. दोघांवरूनही नजर हटत नाही, ते त्याचमुळे.

रणवीरसोबत सारा डान्स करतानाही दिसतेय. तिचे डान्स मुव्ह धम्माल आहेत.

‘भालेराव तुम्ही कभी किसी का एन्काऊंटर करना हो ना तो मुझसे टिप ले लेना’ हा डायलॉग म्हणताना तिच्या चेहºयावरचे भाव वेडावून टाकणारे आहेत. ‘सिम्बा’ हा साराचा दुसरा चित्रपट असणार आहे. ‘सिम्बा’ रिलीज होण्याआधी सारा ‘केदारनाथ’मधून डेब्यू करतेय.