बालकलाकार ते दाक्षिणात्य चित्रपट! सगळीकडेच आहे ग्लॅमगर्ल नेहा पेंडसेचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 01:12 PM2018-11-29T13:12:18+5:302018-11-29T14:12:13+5:30

मराठीतील काही हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक अशी नेहा पेंडसे हिचा आज वाढदिवस आहे.

मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअलिटी शोमधून ती सर्वांच्या ओळखीचा चेहरा बनलेली आहे.

मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून काम केलं होतं.

झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या टीव्ही सिरीअलमध्ये तिने सहनशील गृहिणीची भूमिका केली होती.

तर हिंदीमध्ये ‘मे आय कम इन मॅडम’ या विनोदी कार्यक्रमात तिने हॉट लेडी बॉसचा रोल केला होता.

मराठीतील ग्लॅमगर्ल तसेच बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

लहान असल्यापासून ती कॅमेऱ्यासमोर काम करते आहे.

बालकलाकार म्हणून तिने अनेक कामं केली आहेत.

नटसम्राट, प्यार कोई खेल नहीं, तसंच दाक्षिणात्य चित्रपटांत तिने काम केलं आहे.

शास्त्रीय नृत्यासोबतच तिने पोल डान्सचं रितसर प्रशिक्षण घेतलं आहे.