रिसेप्शनमध्ये दिसला सायना नेहवालचा रॉयल अंदाज! पाहा, इनसाईड फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:02 PM2018-12-17T13:02:28+5:302018-12-17T13:14:14+5:30

भारताची स्टार बॅटमिंटनपटू सायना नेहवाल गत १४ डिसेंबरला बॅडमिंटनपटू पी. कश्यपबरोबर लग्नबेडीत अडकली. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला होता. काल हैदराबादेत या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनचे खास फोटो खास आपल्यासाठी....

सायना व पी कश्यप दोघेही दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण यावर्षी त्यांनी याबाबतचा खुलासा केला होता.

सायनाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर रिसेप्शनचे काही फोटो शेअर केले आहेत.

या रिसेप्शनमध्ये सायनाने इंडिगो कलरचा लहंगा घातला होता. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर सब्यसाची यांनी ही लहंगा डिझाईन केला होता.

सायनाचा पती पी. कश्यप यानेही इंडिगो कलरची शेरवानी घातली होती. रिसेप्शन पार्टीतील दोघांचाही रॉयल लूक पाहण्यासारखा होता. पी. कश्यपने आपल्या शेरवानीसोबत तुस्सार जॉर्जेटची शाल कॅरी केली होती. या शॉलच्या बॉर्डरवर गोल्डचे वर्क केले होते.

रिसेप्शनमध्ये कपलने केकही कापला. हा क्षणही कॅमेºयाने टीपला.

लग्नानंतरचे फोटो शेअर करताना सायनाने, माझ्या आयुष्यातील सर्वेश्रेष्ठ मॅच, असे लिहिले होते. सायना व पी कश्यपच्या या रिसेप्शनला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

सायना व पी. कश्यप दोघेही हैदराबादेतील आहे. १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या या खेळाडूंनी याच वर्षी आपले रिलेशनशिप जगजाहिर केले होते.