Priyanka Nick Wedding : प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या उमेद भवन या लग्नस्थळाचे पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 07:15 AM2018-11-26T07:15:00+5:302018-11-26T07:15:01+5:30

प्रियांकाचे लग्न २ डिसेंबरला असून लग्नापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. प्रियांका तिचा प्रियकर निक जोनाससोबत राजस्थानधील उमेद भवन येथे लग्न करणार आहे.

अलीकडे प्रियांका चोप्रा आई मधू चोप्रासोबत जोधपूरला गेली होती. येथे त्यांनी उमेद भवनमध्ये सुरू असलेल्या लग्नाच्या तयारीची पाहणी केली.

उमेद भवन हे भारतातील प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे. उमेद भवन हा पू्र्वी राजमहाल होता. पण आता त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. उमेद भवन अतिशय भव्य असून त्याची सजावट ही अतिशय सुंदर आहे. उमेद भवन हे मोठाले असून त्यात सगळ्या आधुनिक सुविधा देखील आहे.

उमेद भवनचे केवळ एका रात्रीचे भाडे ४३ लाख असल्याचे म्हटले जात आहे. या पॅलेसमध्ये विविध सुट असून त्यांच्या किंमती वेगवेगळ्या आहेत.

प्रियांका चोप्राच्या कुटुंबियांनी या हॉटेलमध्ये ६५ रुम बुक केल्या आहेत.

उमेद भवन येथील एका रूमचे भाडे ६६ हजार रुपये आहे.

उमेद भवनची लग्न करण्यासाठी निवड प्रियांकानेच केली आहे.