‘मर्द को दर्द नहीं होता’चे स्क्रिनिंग! लेकाचा चित्रपट पाहून भावूक झाली भाग्यश्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 02:13 PM2019-03-19T14:13:22+5:302019-03-19T14:21:00+5:30

‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. त्याचा ‘मर्द को दर्द नहीं होता’ हा डेब्यू सिनेमा येत्या २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तत्पूर्वी काल या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. भाग्यश्री, तिचा पती हिमालय दसानी असे सगळे या स्क्रिनिंगला पोहोचले.

अभिमन्यू दसानीच्या हा डेब्यू सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. स्पेशल स्क्रिनिंगवेळी अभिनमन्यू अशा डॅशिंग अवतारात दिसला.

‘पटाखा’ या चित्रपटानंतर राधिका मदान ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. राधिका व अभिमन्यूच्या जोडीने अशी मस्त पोज दिली.

भाग्यश्री व हिमालय दसानी हे लेकाच्या पहिल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी भलतेच आनंदात दिसले.

‘हंटर’ फेम अभिनेता गुलशन देवैय्या हाही यावेळी दिसला.

अभिनेत्री कल्की कोच्लिन स्क्रिनिंगला पोहाचली.

‘दंगल’ फेम फातिमा सना शेख सिंम्पल लूकमध्ये दिसली.

सान्या मल्होत्रा मात्र बोल्ड अवतारात स्क्रिनिंगला पोहोचली.

ऋचा चड्ढा हिने ग्लॅमरस अवतारात हजेरी लावली.

आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप

‘धडक’चा अभिनेता ईशान खट्टर यावेळी दिसला.

कॉमेडियन सुनील ग्रोव्हर