करिना कपूर, सैफ अली खान आणि तैमुरचे हे फोटो पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:46 PM2019-04-11T18:46:01+5:302019-04-11T18:53:15+5:30

करिना कपूर आणि सैफ अली खान हे त्यांच्या कामात कितीही व्यग्र असले तरी ते नेहमीच त्यांचा मुलगा तैमुरसाठी वेळ काढतात.

सैफ, करिना आणि तैमुर नुकतेच व्हेकेशनसाठी रवाना झाले असून त्यांना मुंबईच्या विमानतळावर पाहाण्यात आले.

करिनाने ब्ल्यू जीन्स, पिंक शर्ट आणि गॉगल्स घातले होते. ती या लूकमध्ये खूपच छान दिसत होती.

तैमुरला सैफ अली खानने खांद्यांवर घेतले होते, तो खूपच खूश दिसत होता.

करिना अक्षय कुमारसोबत लवकरच गुड न्यूज या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची चांगलीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

तैमुरने लाल रंगाची कॅप घातली असून त्यात तो खूपच छान दिसत होता.