ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये असा होता ‘मणिकर्णिका’ कंगना राणौतचा अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:10 PM2018-12-18T14:10:48+5:302018-12-18T14:15:21+5:30

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ प्रमाणेच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळाही भव्य ठरला. या लॉन्च इव्हेंटला कंगना राणी लक्ष्मीबाईच्या रूपात दिसली. पाहुया या इव्हेंटची एक झलक़..

ट्रेलर लॉन्चला कंगना लाल रंगाच्या नऊवारीत दिसली. नाकात नथ, कपाळावर लाल कुंकू्न,केसांत माळलेले लालचुटूक फुल असा तिचा अंदाज होता.

ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यान किल्लयाचा सेट उभारण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, तोफा असे सगळे होते.

या चित्रपटात कंगनाने राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे, तिने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

या चित्रपटासाठी कंगनाला दिग्दर्शनाचे क्रेडिटही मिळणार आहे. म्हणजेचं श्रेय नामावलीत दिग्दर्शिका म्हणून कंगना राणौतचे नाव झळकणार आहे.

क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. हे काम कंगनाने पूर्ण केले.