Kangana Ranaut Birthday Special : हे आहेत कंगनाचे गाजलेले चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:44 PM2019-03-23T13:44:32+5:302019-03-23T14:55:42+5:30

कंगनाने नुकतेच मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित होता.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटात प्रेक्षकांना कंगनाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले होते.

तन्नू वेड्स मनू या चित्रपटातील कंगनाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात तिची आणि आर. माधवनची केमिस्ट्री मस्त जमून आली होती.

क्वीन या चित्रपटाने कंगनाच्या करियरला एक वेगळे वळण दिले असेच म्हणावे लागेल.

तन्नू वेड्स मनू या चित्रपटाचा दुसरा भाग असलेला तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स या चित्रपटात कंगनाने डबल रोल साकारला होता.

क्रिश 3 या चित्रपटातील कंगनाचा लूक आणि तिची भूमिका हटके होती.

गँगस्टर या चित्रपटाद्वारे कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.

काईट्स या चित्रपटात कंगना आणि हृतिक रोशन यांनी एकत्र काम केले होते.

फॅशन या चित्रपटातील भूमिकेसाठी कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

लाइफ इन मेट्रो या चित्रपटामुळे कंगनाच्या करियरला एक दिशा मिळाली.