जान्हवी कपूरचा इन्स्टावर रेड हॉट अंदाज, कायली जेनरशी केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 08:30 PM2019-04-08T20:30:37+5:302019-04-08T20:33:22+5:30

'धडक' गर्ल जान्हवी कपूरने नुकतेच इंस्टाग्राम अकाउंटवर रेड ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप हॉट व ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोंवर कौतूकांचा वर्षाव होत आहे.

जान्हवीचा हा अंदाज पाहून तिच्या चाहत्यांनी तिची तुलना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत केली आहे. एका चाहत्याने कमेंट केली की, 'तुला इंडियन कायली जेनर बनायचे आहे का?'

जान्हवी सध्या सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे फोटो शेअर करत असते.

शशांक खेतान दिग्दर्शित 'धडक ' चित्रपटातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आता ती 'तख्त' चित्रपटात झळकणार आहे.

तख्त चित्रपटा व्यतिरिक्त जान्हवी 'कारगिल गर्ल' चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. या चित्रपटात ती गुंजन सक्सेनाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

'कारगिल गर्ल' चित्रपटात अंगद बेदी तिच्या भावाच्या भूमिकेत तर पंकज त्रिपाठी वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या दोन्ही चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी लवकरच निर्माता दिनेश विजनच्या रुह आफजामध्ये देखील दिसणार आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव व वरूण शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.