हॅपी बर्थ डे मोनालिसा...पाहा, भोजपुरी सुंदरीचे खास फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 11:59 AM2018-11-21T11:59:30+5:302018-11-21T12:32:20+5:30

भोजपुरी सिनेमातील आघाडीची अभिनेत्री मोनालिसा हिचा आज (२१ नोव्हेंबर) वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त बघूयात, मोनालिसाचे काही खास फोटो...

मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. भोजपुरी सिनेमात एन्ट्री घेण्यापूर्वी तिने मोनालिसा हे नवे नाव धारण केले.

२००८ मध्ये ‘भोेले शंकर’ या भोजपुरी चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

अलीकडे एका मुलाखतीत मोनालिसा भोजपुरी चित्रपटांबद्दल बोलली होती. भोजपुरी चित्रपटांच्या वाट्याला प्रशंसेपेक्षा तुच्छताच अधिक येते, असे तिने म्हटले होते. अर्थात असे असले तरी याच भोजपुरी सिनेमांनी मला अपार यश दिलेयं, हेही तिने मान्य केले होते.

मोनालिसाने ५० पेक्षा अधिक भोजपुरी सिनेमांत काम केले आहे.

भोजपुरी सिनेमाशिवाय ‘बिग बॉस १०’ मध्ये मोनालिसा दिसली होती. बिग बॉसच्या घरात मोनालिसाने विक्रांत सिंह राजपूतसोबत लग्न केले होते. अनेकांनी या लग्नाला पब्लिसिटी स्टंट म्हटले होते.

मोना व विक्रांतच्या लोकप्रीय जोडीने ‘नच बलिये’ या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्येही आपला जलवा दाखवला होता.