Happy Birthday Ankita : बर्थ डे गर्ल अंकिता लोखंडेच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 12:07 PM2018-12-19T12:07:37+5:302018-12-19T12:13:34+5:30

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा आज (१९ डिसेंबर) वाढदिवस. सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असलेल्या अंकिताचे काही ग्लॅमरस फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अंकिता लोखंडे लवकरच कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय.

या चित्रपटात अंकिता झलकारी बाईचे ऐतिहासिक पात्र साकारणार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची एक्स- गर्लफ्रेन्ड अंकिता दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये संधीच्या शोधात होती. अखेर कंगनाने तिला ब्रेक दिला आणि ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात अंकिताची वर्णी लागली. हा अंकिताचा डेब्यू सिनेमा आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे हे दोघे सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण २०१६ मध्ये दोघांचेही ब्रेकअप झाले होते.

अंकिताचा चिडका, संशयी स्वभाव आणि तिचे वाढते दारूचे व्यसन यामुळे सुशांतने तिला सोडल्याची चर्चा यानंतर रंगली होती. क्रिती सॅनन आयुष्यात आल्याने सुशांतने अंकिताला सोडले, अशीही चर्चा होती.

सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर स्वत:ला सावरणे अंकितासाठी बरेच कठीण गेले. पण आता अंकिता या ब्रेकअपच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलीयं.

एका मुलाखतीत अंकिताने आपले मन मोकळे करत नव्या नात्याचा शोध घेत असल्याचे सांगितले होते. मी माझ्या जुन्या नात्यातून बाहेर पडले आहे आणि निश्चितपणे माझ्या प्रिन्स चार्मिंगच्या प्रतीक्षेत आहे,असे ती म्हणाली होती.

ताज्या बातम्या मानाल तर अंकिताच्या आयुष्यात तिचा प्रिन्स चार्मिंग आला आहे. होय, अंकिता बिझनेसमॅन विकी जैनला डेट करत असल्याचे कळतेय. विकी हा बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहभागीदार आहे. अंकिता सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती रोज नवे फोटो शेअर करत असते.

‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाशिवाय संजय दत्तसोबतही तिने एक चित्रपट साईन केल्याची खबर आहे. यात ती महिला पोलिसाची भूमिका साकारणार असेही कळतेय.