Ddeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 12:01 PM2018-11-16T12:01:02+5:302018-11-16T12:41:12+5:30

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण पती-पत्नी झालेत. इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दोघांनीही लग्नगाठ बांधली. या रॉयल वेडिंगमधील दीपवीरचा रॉयल अंदाज सगळ्यांनाच भावला. विशेषत: दागिण्यांनी लदबदलेली दीपिकाने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवला. पाहुया...दीपवीरच्या शाही लग्नाचा शाही अंदाज...

दीपवीरने कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. कोंकणी पद्धतीच्या लग्नात दीपिकाने गोल्डन कलरची कांजीवरम सिल्कची साडी नेसली होती तर सिंधी विवाहावेळी लाल रंगाचा लहेंगा.

कोंकणी पद्धतीच्या विवाहावेळी रणवीर अतिशय आनंदात होता. त्याच्या हातातील सुरेख हार अप्रतिमचं म्हणायला हवा

दीपिकाचा चुडा तर हटके होता. त्यावरही अनेकांच्या नजरा खिळल्या.

दोघांच्याही बोटातील साखरपुड्याची अंगठी खास म्हणायला हवी. सिंधी ब्राईडल लूकमध्ये या अंगठीची झलक स्पष्ट दिसतेय.

दीपिकाच्या या हास्यावर तर अनेकजण फिदा आहेत.