स्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 03:16 PM2019-01-23T15:16:49+5:302019-01-23T15:20:46+5:30

सुनील शेट्टी- 1992 मध्ये सुनील शेट्टीनं बलवान चित्रपटामधून पदार्पण केलं. सध्या सुनील शेट्टी फार चित्रपटात दिसत नाही. मात्र त्यानं स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर एक काळ गाजवला.

अक्षय कुमार- सध्या अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या अक्षय कुमारनं खिलाडी म्हणूनही ओळखला जातो. अक्षयची खिलाडी सीरिज चांगलीच गाजली होती. अक्षय कुमारची एकूण संपत्ती 1 हजार कोटींपेक्षा अधिक आहे.

जॅकी श्रॉफ- कोणीही गॉडफादर नसताना जॅकी श्रॉफनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. सध्या जॅकी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करतो.

कपिल शर्मा- कॉमेडीमधून करिअर सुरू करणाऱ्या कपिलनं किस किस को प्यार करू चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानं या चित्रपटातून 15 कोटींची कमाई केली.

नवाजुद्दीन सिद्दीकी- संघर्षाच्या काळात नवाजुद्दीननं जवळपास अडीच वर्षे फक्त चहा आणि बिस्किटांवर दिवस काढले. मात्र त्यानंतर नवाजुद्दीननं मागे वळून पाहिलं नाही. मांझी, बदलापूर या चित्रपटांमध्ये त्यानं आपल्या दमदार अभिनयानं छाप पाडली.

शाहरुख खान- किंग खानच्या एकूण संपत्तीचं मूल्य जवळपास 5 हजार 177 कोटी रुपये इतकं आहे. तो जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे.

अमिताभ बच्चन- वयाच्या पंचाहत्तरीनंतरही बिग बींचा उत्साह तरुणांना लाजवेल इतका आहे. त्यांच्या संपत्तीचं मूल्य 400 मिलियन डॉलर इतकं आहे.