सेलिब्रिटींचा कारनामा! जाणून घ्या तुमच्या आवडत्या स्टारकडे कोणती कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 06:59 PM2019-02-12T18:59:49+5:302019-02-12T19:08:23+5:30

सनी लिऑन अगदी कमी कालावधीत भारतात लोकप्रिय झाली. सनीकडे मॅसेरॅटी कार आहे. या कारची किंमत 3 कोटी आहे.

आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूड गाजवणाऱ्या दीपिका पादुकोणकडे मिनी कूपर आणि ऑडी Q7 कार आहे. यातील मिनी कूपरची किंमत 30 लाख, तर ऑडी Q7 ची किंमत 70 लाख इतकी आहे.

बाजीराव सिंघम अजय देवगणकडे मॅसेरॅटी क्वॉट्रोपोर्टे कार आहे. या गाडीची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे.

धूममध्ये वेगावर स्वार झालेल्या जॉन अब्राहमचं बाईक आणि कार प्रेम सर्वश्रुत आहे. जॉनकडे लॅम्बॉर्गिनी गॅलेर्डा कार आहे. या गाडीची किंमत 3 कोटी रुपये इतकी आहे.

प्रियंका चोप्रानं बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. देसी गर्लकडे बीएमडब्ल्यू 7 सीरिजमधील कार आहे. याशिवाय मर्सिडीज आणि रॉल्स रॉईसदेखील आहे.

हृतिक रोशनकडे अनेक आलिशान कार आहेत. त्याच्याकडे असलेल्या पोर्श कॅयेन्ने कारची किंमत जवळपास 2 कोटी इतकी आहे. याशिवाय हृतिककडे जॅग्वार एक्सजे आणि मर्सिडीज एस500 या गाड्या आहेत.