Birthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा! फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 10:27 AM2018-12-09T10:27:39+5:302018-12-09T10:32:42+5:30

भारताची पहिली मिस एशिया पॅसिफिक, प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची अभिनेत्री-निर्माती दिया मिर्झा हिचा आज (९ डिसेंबर) वाढदिवस.

‘रहना है तेरे दिल में’ या सिनेमापासून बॉलिवूडमध्े पदार्पण केलेल्या दिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आणि ती पहिली मिस एशिया पॅसिफिक ठरली.

९ डिसेंबर १९८१ रोजी बंगाली आई-जर्मन पित्याच्या पोटी दियाचा जन्म झाला.

दियाच्या आईने पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर अहमद मिर्झा यांच्याशी दुसरे लग्न केले. याचमुळे दियाच्या नावासोबत मिर्झा हे आडनाव चिकटले.

दियाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पुढे ती मॉडेलिंगमध्ये आली. यानंतर काही लहानमोठ्या टीव्ही जाहिरातीत झळकली. लिप्टन टी, इमामी प्रॉडक्टच्या जाहिरातींमुळे दिया जाहिरात विश्वातील लोकप्रीय चेहरा बनली.

२००० मध्ये तिने ‘मिस एशिया पॅसिफिक’चा किताब जिंकला. याचवर्षी मिस ब्युटीफुल स्माईल आणि क्लोजअप स्माईलचा किताबही आपल्या नावावर केला.

२००५ मध्ये दियाने ग्रेट वुमन अचिव्हरचा किताब जिंकला. यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत तिचे प्रस्थ वाढले.

२००१ मध्ये ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून दियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील आर माधवनसोबतची तिची लव्ह केमिस्ट्री सगळ्यांनाच भावली.काही यशस्वी तर काही अयशस्वी सिनेमांनंतर दियाने चित्रपट निर्मितीत पदार्पण केले. विद्या बालनला प्रमुख भूमिकेत घेऊन ‘बॉबी जासूस’ चित्रपटाची निर्मिती केली.

२०१४ मध्ये तिने बिझनेस पार्टनर साहिल संगाशी याच्यासोबत लग्न करत संसार थाटला. अलीकडे संजय दत्तचे बायोपिक ‘संजू’मध्ये दिया दिसली होती.