'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूरच्या ग्लॅमरस अदा, फोटो पाहून व्हाल दंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 09:00 PM2019-03-26T21:00:00+5:302019-03-26T21:00:00+5:30

वाणी कपूर नेहमीच हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. सध्या ती आगामी चित्रपट 'शमशेरा'मुळे चर्चेत आहे.

'शमशेरा'मध्ये वाणी कपूरसोबत अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे.

'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे.

तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

रणबीर कपूर व वाणी कपूर यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

शेवटची वाणी कपूर रणवीर सिंगसोबत 'बेफिक्रे' चित्रपटात झळकली होती.

'बेफिक्रे'मध्ये वाणी व रणवीर यांचे बरेच किसिंग सीन होते. त्यामुळे वाणी खूप चर्चेत आली होती.