उन्हाळ्यामध्ये फ्रेश लूक मिळवण्यासाठी 'या' 5 टिप्सचा वापर करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 02:48 PM2019-04-22T14:48:32+5:302019-04-22T14:56:28+5:30

महिलांप्रणाणेच पुरूषांनीही आपल्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यांची त्वचा महिलांच्या तुलनेत अधिक संवेदनशील नसली तरिही उन्हाळ्यामध्ये सूर्याची प्रखर किरणं आणि वातावरणातील उकाड्याचा त्यांच्या त्वचेवर देखील परिणाम होत असतो.

उन्हाळ्यामध्ये महिलांप्रमाणेच पुरूषांनीही आपल्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. आज आम्ही पुरूषांसाठी काही खास स्किन केयर टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून उन्हाळ्यामध्ये त्यांना फ्रेश आणि हेल्दी त्वचा मिळवण्यास मदत होईल.

जर तुम्ही तुमच्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेत नसाल किंवा कंटाळा करत असाल तर असं अजिबात करू नका. उन्हाळ्यामध्ये होणारी टॅनिंग, स्किन डॅमेज तसेच घामामुळे चेहऱ्यावर चिकटणारी धूळ, माती, प्रदूषण सर्व गोष्टी हटवण्याची गरज असते. त्यामुळे दररोज किमान दोन वेळा तरी फेस वॉश करणं गरजेचं असतं.

उन्हाळ्यामध्ये फिरताना चेहऱ्यावर घाम आणि त्यानंतर धूळ, माती चिकटणं कॉमन असतं. यापासून सुटका करून घेण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने फेस वॉश करणं प्रत्येकवेळी शक्य नसतं. अशातच फेस वाइप्सच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. उन्हाळ्यामध्ये आपल्यासोबत फेस वाइप्स कॅरी करा.

जर तुम्ही दररोज टू-व्हीलरवरून प्रवास करत असाल तर चेहरा कॉटनच्या कपड्याने कव्हर करायला विसरू नका. कॉटनचा कपडा या कामासाठी अत्यंत बेस्ट ठरतो. हे गरम हवेला सरळ चेहऱ्यावर येण्यापासून वाचवतो आणि जर उकाड्यामुळे चेहऱ्यावर घाम आला तर तोही शोषून घेण्यासाठी मदत करतो.

फक्त चेहऱ्यावर महागडे प्रोडक्ट्स लावल्याने त्वचा हेल्दी राहत नाही तर, त्यासाठी त्वचा आतून हेल्दी करणं गरजेचं असतं. त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्याचं सर्वात मोठ कारण म्हणजे, त्वचेचा ओलावा नष्ट होणं. त्यासाठी मुबलक पाणी पिणं गरजेचं असून त्वचा आतून हायड्रेट करण्यास मदत करतं. तसेच यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.