डोक्याच्या त्वचेवरील पिंपल्सने हैराण आहात? या घरगुती उपयांनी दूर करा ही समस्या

By अमित इंगोले | Published: January 15, 2019 01:18 PM2019-01-15T13:18:08+5:302019-01-15T13:33:18+5:30

अनेकांना डोक्याच्या त्वचेवर पिंपल्स येण्याची समस्या असते. पण जसे चेहऱ्याच्या पिंपल्सवर उपाय केले जातात, तसे डोक्याच्या त्वचेवर काय करावे हे अनेकांना माहीत नसतं. अनेकांना अशीही भीती असते की, यावर काही उपाय केला तर केसांचं नुकसान होईल. डोक्याच्या त्वचेवर पिंपल्स अस्वच्छता, डॅंड्रफ आणि वातावरणामुळे होतात. जर तुमच्याही डोक्याच्या त्वचेवर पिंपल्स होत असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.

लसूण - लसणामध्ये सेलिसिलिक अॅसिड असतं. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेवर होणाऱ्या पिंपल्सची समस्या लगेच दूर होते. ही समस्या दूर करण्यासाठी काही लसणाच्या कळ्या बारीक करुन डोक्याच्या त्वचेवरील पिंपल्सवर लावा. याने पिंपल्समुळे होणाऱ्या वेदनाही दूर होतील आणि पिंपल्सही दूर होतील.

कडूलिंबाचं पाणी - कडूलिंबामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी फंगल गुण असतात. जे डोक्याच्या त्वचेवर होणारे पिंपल्स दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. काही कडूलिंबाची पाने पाण्यात टाकून उकडू द्या. हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या. हे पाणी डोक्यावर लावून साधारण १ तास तसंच ठेवा आणि नंतर डोकं धुवा.

मध आणि दालचीनी - दालचीनीमध्ये असलेल्या अॅंटी इंफ्लेमेट्री आणि मधात असलेले अॅंटी-मायक्रोबिअल गुण हे पिंपल्स दूर करतात. त्यासाठी २ चमचे मध आणि दालचीनी मिश्रित करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावा आणि एक तासांसाठी तसंच राहू द्या. त्यानंतर डोकं धुवा.

टोमॅटो - टोमॅटो त्वचेची पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत करतो. यात भरपूर प्रमाणात सेलिसिलिक अॅसिड असतं, जे डोक्याच्या त्वचेसाठी फायदेशीर असतं. टोमॅटोने केसांची चांगली वाढ होते. त्यासाठी टोमॅटोचा ज्यूस काढा. नंतर हा ज्यूस डोक्याच्या त्वचेसोबतच केसांना लावा. काही वेळाने डोकं धुवा.

लिंबाचा रस - लिंबाचा रस केसांसोबतच पिंपल्स दूर करण्यासही मदत करतो. एक चमचा लिंबाचा रस आणि त्यात एक चमचा पाणी मिश्रित करा. हे मिश्रण १५ मिनिटांसाठी डोक्याच्या त्वचेवर लावून ठेवा. याने पिंपल्स लगेच दूर होतील.