मेकअप करताना 'या' 8 ब्रशचा करा वापर; सौंदर्य खुलवण्यासाठी करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 06:30 PM2019-03-26T18:30:11+5:302019-03-26T18:37:28+5:30

मेकअप ब्रशचा वापर करण्याटी एक पद्धत असते. जवढं सोपं हे वाटतं तेवढं हे असत नाही. परंतु योग्य ट्रिक्स वापरल्या तर तुम्ही योग्य ब्रशच्या मदतीने सहज मेकअप करू शकता. काही मेकअप ब्रश वापरणं तर सर्वचं शिकतात. पण मेकअपच्या मदतीने परफेक्ट लूक मिळवण्यासाठी ब्रशचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं असतं. आज आम्ही तुम्हाला 8 ब्रशचा उपयोग करण्याबाबत काही ट्रिक सांगणार आहोत.

जर तुमचं फाउंडेशन स्मूथ आणि लिक्विड स्वरूपात असेल तर तुम्हाला त्वचेवर अप्लाय करण्यासाठी फाउंडेशन ब्रशचा वापर करणं गरजेचं असतं. यामुळे फक्त एकाच स्ट्रोकमध्ये स्किनवर पसरण्यास मदत होते.

फाउंडेशन आणि कन्सीलर व्यवस्थित सेट होण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर करा. हे संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित डॅब करा. ब्यूटी ब्लेंडरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी ब्लेंडर पाण्याच्या मदतीने ओलं करून घ्या. त्यानंतर त्यामधील एक्स्ट्रा पाणी काढून टाका. त्यानंतरच फाउंडेशन घेऊन चेहऱ्यावर डॅब करा. तुम्हाला परफेक्ट लूक मिळण्यास मदत होईल.

काबुकी ब्रश एक खास ब्रश असून याचा ब्लुशर ब्रशप्रमाणे वापर करण्यात येतो. फक्त हा थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करतो. तुमच्या कपाळापासून चीर बोन्स आणि जॉव लाइनपर्यंत '3'च्या आकारामध्ये लावा. तुम्हाला परफेक्ट फिनिश मिळण्यास मदत होते.

मेकअप किटमध्ये पावडर ब्रश असणं गरजेचं असतं. याचा वापर केल्याने संपूर्ण मेकअप सेट होण्यास मदत होते. याचा वापर डोळ्यांच्या खाली, चीक बोन्स, जॉ लाइन इत्याही जागांवर व्यवस्थित करा.

पुढच्या बाजून प्लॅट ब्रश खास करून डोळ्यांच्या खालील त्वचेसाठी वापरण्यात येतो. ज्यांचे डोळे छोटे असतात. त्यांनी या ब्रशच्या मदतीने आय शॅडो घेऊन डोळ्यांच्या खाली लावा. डोळे सुंदर दिसतील.

ब्लेंडिंग आय शॅडो ब्रशचा वापर आय शॅडो लावण्यासाठी करण्यात येतो. तुम्ही आय शॅडो ब्रशने लावा किंवा हाताच्या सहाय्याने, त्यानंतर ब्लेंडिंग ब्रशचा वापर नक्की करा. यामुळे आय शॅडोचा कलर पूर्णपणे डोळ्यांवर ब्लेंड करण्यासाठी मदत होते.

विंग्ड आयलायनर तुम्हाला फार आवडत असेल पण ते अप्लाय करणं जमतं नसेल तर एंगल्ड आय लायनर ब्रशचा वापर करा. यावर जेल आयलायनर लावून पहिल्यांदा डोळ्यांच्या आतून बाहेर आणि त्यांनतर बाहेरून आतील बाजूला लावा. परफेक्ट एंगल्ड आय लायनर लूक मिळण्यास मदत होइल.

लॅश ब्रो एक असा ब्रश आहे, ज्यामध्ये एका बाजूला ब्रशचे बी आल आणि दुसऱ्या बाजूला छोटासा कंगवा असतो. याचा वापर आयब्रोला शेप देण्यासाठी करण्यात येतो. आयब्रोज पेन्सिलचा वापर केल्यानंतर ब्रश असणाऱ्या बाजूने केलर सेट करू शकता. त्यानंतर कंगवा असलेल्या बाजूने आयब्रोला शेप द्या.