तुम्हीही आयब्रो कलर करत आहात का? 'या' 5 टिप्स करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 04:19 PM2019-01-21T16:19:13+5:302019-01-21T16:25:22+5:30

फॅशन वर्ल्डमध्ये कधी कोणती फॅशन ट्रेंडमध्ये येईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत तुम्ही हेअर कलर ट्रेंडमध्ये असल्याचे ऐकले असेल पण हल्ली एक अनोखी फॅशन ट्रेंडमध्ये आहे, ती म्हणजे आयब्रो कलर करण्याची. यासाठी अनेकदा ब्लीचचा वापर करण्यात येतो. जर तुम्हीही ब्लीच करून आयब्रो कलर करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

केसांचा कलर ज्याप्रमाणे आपल्या सौंदर्यात भर घालण्याचं काम करत असतो. तर विचार करा की, आयब्रो कलर केल्यामुळे तुमच्या लूकवर काय परिणाम होत असतील. त्यामुळे तुम्ही सर्वात आधी याबाबत विचार करा आणि त्यानंतरच आयब्रो कलर करण्याचा निर्णय घ्या.

ज्याप्रमाणे केसांना कलर करताना आपण विचार करून जो तुम्हाला सूट होईल असा कलर निवडतो. त्याचप्रमाणे आयब्रोसाठी कलर निवडतानाही सावध रहा. प्रयत्न करा की, आयब्रोचा रंग हा तुमच्या केसांच्या रंगाप्रमाणेच असेल. त्यामुळे लूक आणखी खुलण्यास मदत होईल.

साधारणतः भारतीयांच्या आयब्रोचा रंग हा ब्लॅक असतो. अशातच कलर करण्यासाठी सर्वात आधी ब्लीच किंवा कलर करण्यात येतो. या कामासाठी अनेकदा फार वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला पेशन्स ठेवणं फार गरजेचं असतं.

आयब्रो ब्लीच करण्याचा प्रयत्न घरी अजिबात करू नका. ब्लीचमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. ज्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर जास्त ब्लीचमुळे आयब्रोचा कलर लाइट होतो. त्यामुळ त्या दिसतही नाहीत. त्यामुळे एखाद्या एक्सपर्ट्सच्या सल्यानेच आयब्रो कलर करा.

आयब्रो पार्लर किंवा सलूनमध्येच कलर करा. त्यामुळे ब्लीच केल्यानंतर थोडासाही त्रास होत असेल तर एक्सपर्ट्सना लगेचच सांगा. त्यामुळे तुम्हाला इचिंग किंवा रॅशेजसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.