केस गळण्याचं कारण तुमचा शॅम्पू तर नाही ना?; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:27 PM2019-05-17T13:27:41+5:302019-05-17T13:36:43+5:30

महिला असो किंवा पुरूष केस गळण्याच्या समस्यांचा दोघांनाही सामना करावा लागतो. अनेक लोकांना असं वाटतं की, केस गळण्याचं प्रुमख कारण हा शॅम्पूच असतो. याउल अनेक लोकांचा असा समज असतो की, शॅम्पूमुळे केस गळत नाहीत तर, ते हेल्दी होतात. जाणून घेऊया त्वचारोगतज्ज्ञ नितीन बरडे यांचं मत...

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शॅम्पूमुळे केस गळतही नाहीत आणि केस गळण्याचे थांबतही नाहीत. केस गळण्याची खरी कारणं वेगवेगळी असू शकतात. तसेच बाजारामध्ये अनेक वेगवेगळे शॅम्पू उपलब्ध असतात. शॅम्पू केस गळण्यासाठी कारणीभूत का ठरत नाही, जाणून घेऊया...

शॅम्पूचं काम फक्त केस आणि स्काल्प स्वच्छ करणं असतं. हे केसांच्या त्वचेवरच राहत असून ते केसांच्या मुळाशी जात नाहीत. केसांची मुळं स्काल्पच्या आतमध्ये असतात. जर तुम्ही हार्श शॅम्पू वापरत असाल तर तो केस डॅमेज करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, पण केसांच्या मुळांपासून होणाऱ्या हेअरफॉलसाठी जबाबदार ठरतं नाहीत. माइल्ड शॅम्पूचा वापर केल्याने केस डॅमेज होत नाहीत.

एक्सपर्ट्सनुसार, हेअर ग्रोथ एका सायकलनुसार होत असते. यामध्ये ग्रोथ स्टेज, रेस्टिंग स्टेज आणि शेडिंग स्टेज असते. शेडिंग स्टेजमध्ये केस मुळापासून गळतात.

एखादा शॅम्पू वापरताना तुमचे केस जास्त गळू शकतात किंवा एखादा शॅम्पू वापरताना कमी गळू शकतात परंतु हेअर सायकलमधील शेडिंग स्टेजमध्ये केस विंचरताना किंवा केसांना तेल लावताना जास्त गळतात.

जर तुम्हाला हेअरफॉल थांबवायचा असेल तर, याचं मुख्य कारण जाणून घेऊन त्यावर योग्य ते उपचार करणं आवश्यक आहे. केस गळण्याचीही अनेक मुख्य कारणं असतात. ज्यामुळे पोषक तत्वांची कमतरता, आजारी असणं, हार्मोन्समध्ये बदल किंवा गरोदरपणा यांसारख्या समस्यांचा समावेश असतो.

यासाठी तुम्ही बॅलेंस्ड डाएट ज्यांमध्ये पोषक तत्वांचा समावेश असेल अशा पदार्थांचं सेवन करणं गरजेचं असतं. केसांना मुळांपासून आणि फॉलिकल्सपासून मजबुत करणं गरजेचं असतं. योग्य पोषण किंवा एखादी अशी ट्रिटमेंट जी ब्लड सर्क्युलेशन वाढविण्यासाठी आणि केसांना पोषण देण्यासाठी आवश्यक असते.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.