केसांना कधी नारळ पाणी लावलं का?; लावा आणि बघा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 01:29 PM2019-04-24T13:29:50+5:302019-04-24T13:38:46+5:30

आरोग्यासाठी नारळपाण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. नारळामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. तसेच नारळाचा वापर त्वचेसाठी आणि केसांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासोबतच केसांचं आरोग्य राखण्यासाठी नारळ पाणी मदत करतं. आज आम्ही तुम्हाला नारळ पाण्याचे काही फायदे सांगणार आहोत. जे केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

नारळाचं पाणी केसांना हायड्रेट ठेवतं आणि स्काल्पचा कोरडेपणाही दूर करतं. ब्लड सर्क्युलेशन वाढविण्यासाठीही हे फायदेशीर ठरतं. जवळपास अर्धा कप नारळाचं पाणी घ्या आणि त्याने स्काल्पला मसाज करा. 5 मिनिटांपर्यंत मसाज करा आणि साधारणतः 20 मिनिटांसाठी असचं ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूने धुवून टाका. आठवड्यातून 3 वेळा असं केल्याने फायदा होईल.

अर्धा कप नारळाच्या पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा. स्काल्पवर याने मसाज करा आणि उरलेलं पाणी केसांना लावा. हे 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा. असं आठवड्यातून एकदा करणं गरजेचं असतं. नारळा पाण्यामुळे केस हायड्रेट राहतात आणि लिंबामुळे कोलेजन प्रोडक्शन वाढतं. यामुळे केसांची वाढ लवकर होते. स्काल्पचा पीएच लेव्हलही वाढते.

नारळ आणि कोरफड दोन्ही केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामुळे केसांमधील डँड्रफ, खाज आणि ड्रायनेस यांसारख्या समस्यांपासून सुटका होते. त्यासाठी दोन चमचे कोरफडीचा गर अर्धा कप नारळाच्या पाण्यामध्ये एकत्र करा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये एकत्र करा. ज्यामुळे केसांना व्यवस्थित लावण्यास मदत होइल. हे मिश्रण केसांना लावून तुम्ही 4 दिवसांपर्यंत ठेवू शकता.

नारळाचं पाणी आणि सफरचंदाचं व्हिनेगर केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे केसांचा ड्रायनेस, घाण आणि डँड्रफसारख्या समस्या दूर होतात. तसेच स्काल्पची पीएच लेव्हल मेन्टन ठेवण्यासाठी मदत होते. त्यासाठी एक कप नारळ पाण्यामध्ये एक चमचा सफरचंदाचं व्हिनेगर एकत्र करा. हे मिश्रण काही वेळासाठी केसांवर लावा त्यानंतर शॅम्पूच्या सहाय्याने धुवून टाका.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.