पुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 12:33 PM2018-11-16T12:33:56+5:302018-11-16T12:46:46+5:30

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिलांसोबतच पुरुषांनाही डार्क सर्कल्सचा सामना करावा लागत आहे. अशात डोळ्याखाली दिसणार काळे डाग पुरुषांच्या सुंदरतेत आणि स्मार्टनेस कमतरता आणतात. अनेकदा डोळ्याखाली दिसणारे काळे डाग हे अनहेल्दी लाइफस्टाइलचा परिणाम असतो. खूप जास्त काम करणे, जास्त तणाव घेणे, झोप पूर्ण न होणे आणि इतरही काही कारणांनी डोळ्यांच्या खाली काळे डाग येतात.

डोळ्याखालील काळे डाग दूर करण्यासाठी केवळ महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स किंवा पार्लरमध्ये खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही घरगुती उपायांनीही हे डार्क सर्कल दूर करता येतात. चला जाणून घेऊ पुरुषांच्या डोळ्याखालील काळे डाग दूर करण्यासाठी काही खास उपाय....

काकडी - डार्क सर्कल दूर करण्यासाठी काकडी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. काकडी एक खूप चांगला एस्ट्रीजेंट असतो आणि एक चांगल्या क्लींजरचंही काम करतो. याने डोळ्याखाली आलेले काळे डाग दूर होतात. काकडीचे स्लाइस कापून डोळ्यावर ठेवा. असे दिवसातून दोनदा दहा दिवस केल्यास याचा फायदा दिसेल.

पाणी - जर डोळ्यांखाली डार्क सर्कल ही समस्या तुम्हाला सतत भेडसावत असेल तर भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे. कारण पाणी हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीये. हा एक सामान्य घरगुती उपाय आहे. जो डोळ्याखालील काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट होते आणि डार्क सर्कलची समस्या दूर होते.

पुरेशी झोप - फार दिवसांपासून पुरेशी झोप न मिळत असल्यानेही डोळ्याखाली काळे डाग दिसू लागतात. त्यामुळे तुम्हाला ही समस्या असेल तर आधी पुरेशी झोप घ्यावी. जेव्हा तुमच्या शरीराला आणि डोळ्यांना पुरेसा आराम मिळेत तेव्हा तुमचे डार्क सर्कलही दूर होतील. (Image Credit : arrajol.com)

टी-बॅग्स - टी बॅगचा वापर करुनही पुरुषांच्या डोळ्याखालील काळे डाग दूर केले जाऊ शकतात. चहा प्यायल्यानंतर वापरलेल्या टी बॅग फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेत तेव्हा ते फ्रिजमधून काढून नॉर्मल होऊ द्या. नंतर टी बॅग डोळ्यांवर लावा, याने तुम्हाला फायदा होईल.

टोमॅटो - टोमॅटोमध्ये असे अनेक गुण आहेत जे त्वचेचा डार्क रंग हलका करतात आणि त्वचेवर ग्लो आणतात. एकचा टोमॅटोची पेस्ट आणि लिंबाचा रसाचे काही थेंब एकत्र करा. हे मिश्रण डोळ्याखाली लावा. दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

बटाटे - बटाट्याच्या मदतीनेही डार्क सर्कल दूर केले जाऊ शकतात. बटाटा हा ब्लीचिंग एजंटसारखा काम करतो. याने काळे डाग दूर करण्यास मदत होते.

गुलाबजल - डोळ्यांना ताजेपणा देण्यासाठी गुलाबलचा वापर केला जातो. गुलाबजल कापसाच्या मदतीने डोळ्यांच्या चारही बाजूंनी लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. रोज सकाळी नियमीतपणे हे केल्यास तुमचे डार्क सर्कल दूर होतील.