सनटॅनसाठी उपाय शोधताय? मग किचनमधील 'या' पदार्थांची घ्या मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 07:19 PM2019-06-21T19:19:34+5:302019-06-21T19:25:23+5:30

जर तुम्हीही उन्हाळ्यामध्ये झालेल्या सनटॅनमुळे हैराण असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही स्किनवरील सनटॅनची समस्या दूर करू शकतात. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही कितीही उपाय करा, सनटॅन होतचं. अशातच आम्ही तुम्हाला सनटॅन रिमूव्ह करण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. ज्या तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता.

एक काकडी घेऊन तिचे गोलाकार आकारत स्लाइस कापून घ्या. स्लाइसच्या मदतीने सनटॅनमुळे प्रभावित असणाऱ्या भागांवर हलक्या हाताने मसाज करा. लावल्यानंतर जवळपास 10 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर पाण्याच्या मदतीने धुवून टाका. टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

दोन चमचे बेसन, दोन चमचे हळद पावडर आणि दोन चमचे दही घ्या आणि सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करा. तयार मिश्रण फेस आणि सनटॅन झालेल्या भागात लावा. जोपर्यंत मिश्रण व्यवस्थित कोरडं होत नाही तोपर्यंत तसचं ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका.

दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा. त्यानंतर जवळपास 15 मिनिटं ठेवा त्यानंतर पाण्याने धुवून टाका. टॅनिंग दूर करण्यासाठी हा फेसपॅक सर्वात फायदेशीर ठरतो.

कॉटन बॉल्सच्या मदतीने कच्चं दूध चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 10 मिनिटांसाठी तसचं ठेवून चेहरा पाण्याने धुवून टाका.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.