हिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 01:37 PM2018-12-11T13:37:42+5:302018-12-11T13:46:06+5:30

हिवाळ्यामध्ये सर्वांनाच सतावणारी समस्या म्हणजे स्किन ड्रायनेसची. यामुळे स्किन ब्रेक, त्वचेचा रूक्षपणा, इन्फेक्शन होणं, खाज येणं, रिंकल्स यांसारख्या समस्यां उद्भवतात. या समस्यांपासून सुटका करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ट्रिटमेंटची गरज नाही. तुम्ही घरच्या घरीच या सर्व समस्या दूर करू शकता. घरात सर्रास वापरलं जाणारं तूप तुमच्या त्वचेसाठीही आरोग्यदायी ठरतं.

तुम्हीही ड्राय स्किनमुळे त्रस्त झाला असाल तर तूपाचे काही थेंब घेऊन चेहऱ्यावर लावा. काही वेळ मसाज करा, त्वचेमध्ये पूर्णपणे ऑब्जर्ब होऊ द्या. तुम्हाला लगेचच तुमच्या स्किनमध्ये बदल दिसून येईल. सर्वात खास गोष्ट म्हणजे मॉयश्चरायझर म्हणून तूपाचा वापर केलात तर त्याचा परिणाम दिवसभर जाणवेल आणि ड्राय स्किनची कोणतीही समस्या होणार नाही.

तूप फक्त स्किन मॉयश्चराइझ करण्यासाठी नाही तर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठीही मदत करतं. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन-ई स्किनचे अॅन्टी-एजिंग सेल्स रिपेअर करण्यासाठी उपयोगी ठरतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

तूपाचा वापर बेस्ट बाथ ऑइल म्हणूनही करता येतो. जे दिवसभर आपल्या त्वचेला कोमल करण्यासाठी मदत करते. पाच चमचे तूप तुमच्या फेवरेट सुगंध असलेल्या ऑइलसोबत एकत्र करा. किंवा बाथटबमधील पाण्यामध्ये एकत्र करा. त्वचा ड्राय होण्याची समस्या विसरून जा.

सतत मोबाईल किंवा कंम्प्यूटरचा वापर केल्यामुळे किंवा तासंतास कंम्प्यूटर स्क्रिनसमोर काम केल्यामुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. डोळे डल दिसतात. ही समस्या दूर करण्यासाठी तूपाचा वापर करा. तूपाचे काही थेंब आपल्या बोटांच्या सहाय्याने हळूहळू डोळ्यांखाली मसाज करा. यामुळे डोळांच्या डलेनेस दूर होण्यास मदत होईल.

थंडीमध्ये ओठांचं सुकणं ही सर्वांना उद्भवणारी एक साधारण समस्या आहे. परंतु जर तुम्ही तूपाचा वापर केला तर ही समस्या दूर होते. फक्त तूपाचे काही थेंब ओठांवर लावा आणि व्यवस्थित मसाज करा.