पैसे खर्च न करता मिळवा तजेलदार आणि मुलायम त्वचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 05:36 PM2019-02-13T17:36:13+5:302019-02-13T17:45:40+5:30

आपल्या सौंदर्याबाबत पुरूषांपेक्षा महिला जास्त जागरुक असतात. बाजारात एखादं नवीन प्रोडक्ट आलं आणि त्यांनी ते ट्राय केलं नाही, असं फार कमी पाहायला मिळतं. सुंदर दिसण्याच्या नादात त्या अनेक महागडे प्रोडक्ट खरेदी करतात. एवढचं नाही तर महागड्या पार्लर ट्रिटमेंट्सचा आधारही घेतात.

अनेकदा या महागड्या प्रोडक्ट्सचा काहीच फायदा होत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला अगदी सहज घरामध्ये उपलब्ध होतील. त्यांच्यासाठी तुम्हाला थोडेसुद्धा पैसे मोजावे लागणार नाहीत. पण महागड्या ट्रिटमेंट्समुळे जेवढा फायदा होणार नाही त्यापेक्षा जास्त फायदा या पदार्थांमुळे होईल.

टॉमेटोमध्ये लायकोपीन नावाचं अॅन्टीऑक्सिडंट असतं. जे त्वचेचं प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर हे यूव्ही रेजमुळे त्वचेला होणाऱ्या सनबर्नपासूनही वाचवतं. यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं. जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करतं.

काकडी एक नॅचरल अस्ट्रिन्जन्ट आहे, जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करतं. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन ए त्वचेमधील मेलनिनचे प्रमाण कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. यासाठी एका काकडीची साल काढून त्याचा रस काढून घ्या. हा रस चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी चेहरा थड पाण्याने धुवून टाका. एक महिनाभर असं दररोज केल्याने तुम्हाला फरक जाणवेल.

दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं, जे त्वचेच्या ब्लिचिंग साठी उत्तम ठरतात. दही काही वेळासाठी त्वचेवर लावून तसचं ठेवा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. चेहरा उजळण्यास मदत होइल. तसेच चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

दोन चमचे ऑरेंज पल्प घ्या आणि त्यामध्ये एक चिमूटभर हळद एकत्र करा. तयार मिश्रण आपल्या चेहऱ्यावर झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी थंड पाण्याने धुवून टाका. त्यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि मृत पेशी दूर होण्यासोबतच त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते.

त्वचेला नुकसान पोहोचल्यामुळे स्किन डार्कनेसच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकदा त्यामुळे त्वचा निस्तेज होते. अशातच त्वचा मुलायम करण्यासाठी मधचा उपयोग होतो. मध जवळपास 15 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे फक्त त्वचा सॉफ्ट होणार नाही तर त्वचेच्या इतर समस्याही दूर होतील.