केसगळतीमुळे आहात हैराण?, मग हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 03:10 PM2018-09-03T15:10:07+5:302018-09-03T15:15:52+5:30

केसगळतीच्या समस्येमुळे तुम्ही हैराण झाले असाल तर चिंता करू नका. आपण आज अशा काही टीप्स पाहणार आहोत, ज्यामुळे केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत होते. अळशीच्या बियांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. यामुळे केस वाढण्यास मदत होते. योग्य प्रमाणात अळशीचे सेवन केल्यास केसांची चांगली वाढ होते.

अळशीच्या बिया पाच मिनिटांपर्यंत भाजून त्याची पेस्ट करावी.रोज सकाळी रिकाम्या पोटी या पावडरचे सेवन करावे किंवा पेस्ट दहीसोबत मिसळून खावी.

केसगळती रोखण्यासाठी अळशीचे तेल केसांच्या मुळांना लावावे.

अळशीच्या तेलामुळे केसगळतीची समस्या काही प्रमाणात कमी होईल. शिवाय, कोंड्याच्या त्रासातूनही मुक्तता मिळेल.