मोसंबीचे अनेक आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:58 PM2018-10-10T16:58:04+5:302018-10-10T17:03:16+5:30

मोसंबीच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते त्याचप्रामणे बद्धकोष्ठापासूनही सुटका होते. मोसंबीमुळे वजनही नियंत्रणात राहते. याव्यतिरिक्त गरोदरपणात मोसंबीचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु आरोग्यासोबतच मोसंबी केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात मोसंबीचे त्वचेला होणारे फायदे...

पिगमेंटेशन, स्पॉट्स, ब्लेमिशेस यांसारख्या त्वचेच्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. वाढत्या वयानुसार या समस्याही वाढतात. यापासून बचाव करण्यासाठी स्पॉट्स असलेल्या स्किनवर मोसंबीचा रस लावा. सकाळी उठल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

मोसंबीमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट, अॅन्टी-बायोटिक आणि मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. हे अनेक प्रकारच्या स्किन इन्फेक्शन ठिक करण्यासाठी फायदेशीर ठरतात. मोसंबीचा रस प्यायल्यानेही स्किनला फायदा होतो. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि त्यामुळे स्किनच्या समस्याही दूर होतात.

ज्या लोकांना अधिक घाम येतो त्यांच्यासाठीही मोसंबीचा रस फायदेशीर ठरतो. मोसंबीच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन सी घाम आणि घामामुळे येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

दिवसातून 2 ते 3 वेळा ओठांवर मोसंबीचा रस लावल्याने ओठांच्या समस्या दूर होतात. ओठांसाठी मोसंबीमध्ये असलेले व्हिटॅमिन आणि मिनरल्स फायेदशीर ठरतात.

शरीराला आलेली सूज, वेदना यांसारख्या समस्यांवरही मोसंबीचा रस फायदेशीर ठरतो. सूज आल्या भागावर हा रस लावल्याने फायदा होतो.