केवळ रखरखीत त्वचेसाठीच नाही तर यासाठीही उपयोगी आहे व्हॅसलीन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 12:05 PM2018-10-24T12:05:08+5:302018-10-24T12:20:38+5:30

हिवाळा सुरु होताच त्वचा रखरखीत होऊ लागते आणि त्वचेचा हा रखरखीतपणा दूर करण्यासाठी व्हॅसलीनचा प्रत्येक घरात वापर होतो. व्हॅसलीन हे सामान्य क्रीम आणि लोशनच्या तुलनेत अधिक चांगलं असतं. इतकेच नाही तर काही मुली तर याचा वापर मेकअपचं प्रॉडक्ट म्हणूनही करतात. व्हॅसलीन हे पेट्रोलियन जेली आहे, जे नैसर्गिक वॅक्स आणि मिनरल ऑईलपासून तयार केलं जातं. हे त्वचेवर लावल्याने त्वचा मुलायम होते आणि रखरखीत त्वचेपासून सुटका मिळते. व्हॅसलीन केवळ त्वचेचा रखरखीतपणा कमी करण्यासाठीच नाही तर याचे अनेक इतरही फायदे आहेत. याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करु शकता. चला जाणून घेऊ व्हॅसलीनचा वेगवेगळ्या प्रकारे कसा करायचा वापर...

चेहऱ्यासाठी स्क्रब - जर तुम्हाला चेहऱ्यासाठी स्क्रब तयार करायचं असेल तर व्हॅसलीनमध्ये थोडं मीठ टाका आणि त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. याने चेहऱ्यावरी डेड सेल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होईल. याने चेहरा ग्लो होईल.

जास्तवेळ रहावा परफ्यूमचा प्रभाव - अनेकदा शरीरावर लागलेल्या परफ्यूमचा प्रभाव फार काळ टिकत नाही. अशात जर परफ्यूमचा प्रभाव तुम्हाला अधिक काळ टिकवायचा असेल तर मानेवर आणि मनगटावर परफ्यूमसोबत थोडं व्हॅसलीनही लावा. याने तुम्हाला फायदा होईल. (Image Credit : mtv.fi)

तुटणाऱ्या आणि दुतोंडी केसांसाठी - तुटलेले आणि दुतोंडी केस लपवण्यासाठी व्हॅसलीनचा एक चांगला पर्याय आहे. व्हॅसलीन दोन्ही हातांवर पसरवून केसांना लावा.

जुने शूज चमकवण्यासाठी - जुने शूज नवीन करण्यासाठीही व्हॅसलीनची मदत होते. थोडसं व्हॅसलीन तुमच्या जुन्या शूजवर घासा, याने शूज चमकतील आणि नवीन दिसायला लागतील. (Image Credit : Pinterest)

लिप स्‍क्रब - जर तुमचे ओठ थंडीच्या दिवसात कोरडे आणि त्यांना भेगा पडल्या असतील तर व्हॅसलीनमध्ये साखरेचे काही दाणे मिश्रित करुन लिप स्क्रब तयार करा.

ईयररिंग्स घालण्यास अडचण - जर ईयररिंग्स घालताना तुम्हाला अडचण येत असेल ते कानाच्या छिद्रात जात नसेल तर थोडं व्हॅसलीन लावा. याने ईयररिंग्स सहज कानाच्या छिद्रात जातील.

आयब्रो शायनी करण्यासाठी - आयब्रो शायनी करण्यासाठीही तुम्ही व्हॅसलीनचा वापर करु शकता. याने लगेच आयब्रोवर चमक येईल. याने आयब्रो शेपमध्ये राहण्यासही मदत होईल.

मेकअप रिमूव्हर - व्हॅसलीनचा तुम्ही मेकअप रिमूव्हर म्हणूनही वापर करु शकता. आपलं मेकअप काढण्यासाठी थोडं व्हॅसलीन लावून कॉटनच्या मदतीने चेहरा साफ करा. नंतर पाण्याने धुवा. याने तुमची त्वचा स्वच्छ आणि मुलायम होईल.

नेल पॉलिशचे डाग काढण्यासाठी - नेल पॉलिश लावण्याआधी नखांच्या आजूबाजूच्या त्वचेवर व्हॅसलीन लावा. जेणेकरुन नेल पॉलिशचे आजूबाजूला लागलेले डाग सहज काढता येतील.

त्वचेवर हेअर कलर लागण्यापासून बचाव - अनेकजण घरीच हेअर कलर करतात. केसांना कलर करताना अनेकदा डोकं, कान किंवा मानेवर कलर लागतो. यापासून बचाव करण्यासाठी व्हॅसलीनचा वापर करा.