...जेव्हा तीन कोटींच्या कारचा रणगाडा बनविला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 03:10 PM2019-06-14T15:10:08+5:302019-06-14T15:13:39+5:30

जगप्रसिद्ध कार कंपनी बेंटलीच्या कारची किंमत काही कोटींमध्ये असते. या आलिशान कारनी जगभरात आपली वेगळी ओळख बनविली आहे.

एका महाभागाने बेंटलीच्या कॉन्टिनेंटल जीटी या तब्बल तीन कोटींच्या कारला रणगाड्याची चाके लावली आहेत.

रशियामध्ये या लक्झरी कारला एका कारप्रेमीने मॉडिफाय केले आहे. कारची चाके, दरवाजे काढून त्याजागी रणगाड्याचे पट्ट्याची चाके लावली आहेत.

कॉन्स्टेंटिन जरुस्की असे त्याचे नाव आहे. त्याने एका टीमसोबत हे काम केले आहे. या कारला त्याने 'अल्ट्राटँक' नाव दिले आहे.

कॉन्स्टेंटिनने सांगितले की, या कारला रणगाड्यामध्ये बदलताना अनेक समस्या आल्या. यासाठी सात महिने लागले.

अल्ट्राटँकची अनेकदा ऑफ-रोड टेस्ट करण्यात आल्या. ही कार चालविणे सामान्य कार चालविण्यासारखेच आहे.