मोटरसायकल दीर्घकाळापर्यंत चालवायचीय? मग अशी काळजी घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:03 PM2018-09-24T17:03:09+5:302018-09-24T17:06:51+5:30

जर 4-स्ट्रोक बाईक असेल आणि बऱ्याच काळापर्यंत बाईकचे इंजिन तंदुरुस्त ठेवायचे असेल तर 15 ते 20 हजार किमी बाईक चालविल्यानंतर स्पार्क प्लग बदलावा.

इंजिनचा परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी वेळोवेळी बाजारातील चांगल्या कंपनीच्या इंजिन ऑईलचा वापर करावा. तसेच बाईकची सर्व्हिस वेळच्यावेळी करावी.

आजकाल रस्त्यांवर वाहतूक कोंडी असल्याने बाईक चालविताना क्लचचा वापर जास्त होतो. यामुळे क्लच अॅडजस्ट करणे गरजेचे असते. बाईक चालविताना क्लच दाबून ठेवू नये.

वेळच्यावेळी एअर फिल्टर बदलावा किंवा त्याची साफसफाई करावी. धुळीच्या भागात जास्त एअर फिल्टर लवकर खराब होतो.

बाईकच्या टायरमध्ये हवेचा दाब वेळच्यावेळी तपासावा. कमी दाब असल्यास बाईक कमी मायलेज देते. तसेच जास्त दाब असल्यास बाईक जास्त उडते. याचा चालविणाऱ्याला त्रास होतो.

सर्व बाईकमध्ये चेन असते. चेनला लुब्रिकंट असल्याने धूळ चिकटते. यामुळे चेनची सफाई करणे गरजेचे असते. मऊ ब्रशचा वापर करावा.

बाईकमध्ये आता ड्राय बॅटरीचा वापर होतो. परंतू, तरीही काही काळाने बॅटरी तपासून घ्यावी. यामुळे प्रवासावेळी कोणतीही समस्या येणार नाही.