जाणून घ्या कारचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 05:21 PM2018-09-27T17:21:36+5:302018-09-27T17:27:43+5:30

कारच्या स्टाइल आणि पॉवरसोबतच आता कारच्या सेफ्टी फीचर्सवरही खास लक्ष देण्यात येत आहे. नव्या तंत्रासोबत कार्समध्ये नवीन सेफ्टी फीचर्स दिले जात आहेत. तुम्हीही एबीएस, एअरबॅग्स किंवा सेंट्रल लॉकिंग सिस्टमसारखे सेफ्टी फीचर्सची नावे ऐकली असतील. पण होऊ शकते की, यांचं काम तुम्हाला माहीत नसेल. त्यामुळे आम्ही तुम्हाला हे सेफ्टी फीचर्स कसे काम करतात हे सांगत आहोत.

अॅंटी-लॉक ब्रेक सिस्टीम(एबीएस) - अचानकपणे किंवा जोरात ब्रेक लागल्यावर गाडीचे व्हिल्स लॉक होऊ नये याची काळजी एबीएस घेतं. गाडीमध्ये एबीएस असल्याने अचानक ब्रेक लावल्यावरही गाडीवरील नियंत्रण सुटत नाही आणि गाडी ड्रायव्हरच्या कंट्रोलमध्ये राहते. याने काही दुर्घटना होण्याचा धोका फार कमी होतो.

एअरबॅग्स - अपघात झाल्यावर कार धडकण्याच्या स्पीडनुसार एअरबॅग्स उघडल्या जातात. धडक झाल्यावर कारचा एक्सीलेरोमीटर सर्किट अॅक्टीव्ह होऊन इलेक्ट्रिकल करंट देतं आणि समोर लागलेल्या सेंसरने एअरबॅग्सना सिग्नल मिळतो. त्यानंतर एअरबॅग्स १ ते २० सेकंदात ३२० किमी प्रति तासाच्या वेगानने उघडल्या जातात. कार जेव्हा एखाद्या वस्तूशी धडकते तेव्हा एअरबॅग्स असल्याने समोर बसलेल्या लोकांना डॅश बोर्ड फटका बसण्यापासून बचाव होतो.

रिव्हर्स पार्किंग सेंसर - कार मागे घेताना एखाद्या वस्तूच्या फार जवळ आली तर किंवा कशाशी धडकणार असेल तर कारच्या मागच्या बाजूला लागलेले सेंसर ड्रायव्हरला साऊंडच्या माध्यमातून संकेत देतात. याने कार मागे कशाशी धडकण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे रिव्हर्स पार्किंग सेंसर कारचं महत्त्वाचं फीचर आहे.

डे/नाइट मिरर - हे फीचर सुरक्षा आणि सुविधा दोन्ही दृष्टीने फार उपयोगी आहे. गाडीमध्ये असलेला इंटरनल रिअर व्ह्यू मिरर मागे येत असलेल्या गाडीला बघण्यासाठी उपयोगी ठरतो. पण काही ड्रायव्हर्स प्रत्येकवेळी हाय बीमचा वापर करतात, याने IRVM मध्ये चमक निर्माण होते. जर IRVM मध्ये डे/नाइट मिरर असेल तर ही चमक अॅडजस्ट केली जाऊ शकते.

हेड रिस्ट्रेंट्स - हेड रिस्ट्रेंट्स अपघातावेळी मदत करतं. हे गाडीमध्ये लागले असल्याने गाडी धडकल्यावरही मान आणि खांद्याला कमी मार लागतो. बसताना याची पोजिशन उंचीनुसार अडजस्ट करुन बसले पाहिजे. याची हाइट कमीत कमी आपल्या डोळ्यांपर्यंत असली पाहिजे.

सेंट्रल लॉकिंग सिस्टम - या फीचरच्या माध्यमातून एका बटणा व्दारे कारचे सर्व दरवाजे लॉक करता येतात. कार चालवत असताना या फीचरच्या माध्यमातून हे जाणून घेता येतं की, सर्व दरवाजे लॉक आहेत की, नाही. सुरक्षा आणि सेफ्टीच्या दृष्टीने हे फीचर फार उपयोगी आहे.

फॉग लॅम्प - अपघात टाळण्यासाठी हे फीचर फारच महत्त्वपूर्ण आहे. खासकरुन हे फीचर हिवाळ्यात अधिक उपयोगात येतं. हिवाळ्यात धुकं येत असल्याने समोरचं स्पष्ट दिसत नाही. याने अपघात होण्याचा धोका अधिक वाढतो. फॉग लाइटमुळे खराब वातावरणातही समोरचं स्पष्ट दिसतं.