महिंद्राची सर्वांत महागडी एसयुव्ही येतेय... पाच दिवस वाट पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 07:09 PM2018-11-19T19:09:03+5:302018-11-19T19:12:23+5:30

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची आजपर्यंतची सर्वात महागडी एसयुव्ही भारतीय बाजारात दाखल होणार आहे. SUV Alturas G4 ला 24 नोव्हेंबरला लाँच करण्यात येणार असून स्कॉर्पिओ, एसयुव्ही 500 नंतर महिंद्राची ही आतापर्यंतची सर्वात प्रिमियम कार असणार आहे.

या कारची किंमत 25 ते 30 लाखांच्या दरम्य़ान असण्याची शक्यता आहे. ही फोर्ड एंडोव्हर, टोयोटा फॉर्च्युनर, होंडा सीआरव्ही यासारख्या तगड्या कारना टक्कर देणार आहे. सध्या महिंद्राने या कारबाबत माहिती दिलेली नाही.

या कारच्या नावाबाबत ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. कंपनीने एसयुव्ही श्रेणीमध्ये या कारचे नाव Y400 असे ठेवले होते.

एक्सयुव्ही 500 नंतर या कारचे नाव XUV700 असण्याची चर्चा होती. मात्र, महिंद्राने सर्वांचेच अंदाज चुकवत Alturas G4 असे नाव ठेवले आहे. या नावाचा अर्थ उंची किंवा शिखर असे होते. या एसयुव्ही कारद्वारे महिंद्रा विक्रीमध्ये इतिहास रचण्याच्या प्रयत्नात आहे.

कंपनीने Alturas G4 ची बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. 50 हजार रुपयांत बुक करता येते.

ऑनलाईन बुकिंगसाठी https://www.alturasg4.com,https://www.m2all.com/Alturas-G4.html या लिंकवर जाऊन बुक करता येते. महिंद्रा डिलरशिपकडेही बुक करता येते. बुकिंग रद्द किंवा बदलण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत वेळ मिळणार आहे.

टेस्ट ड्राईव्हसाठी कार 26 नोव्हेंबरनंतर उपलब्ध होईल.