टायरमधील हवेचा दाब कारमध्ये बसल्या-बसल्या समजणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 07:57 AM2019-04-22T07:57:21+5:302019-04-22T08:01:36+5:30

बऱ्याचदा कारच्या टायरमध्ये किती हवा आहे याचा अंदाज येत नाही. यामुळे नेहमी टायर पंक्चर तर नाही ना हे समजण्यासाठी एकतर खाली उतरून किंवा कोणालातरी विचारावे लागते. चारही टायरमध्ये हवा कमी जास्त असल्यास गाडी एका बाजुला ओढली जाण्याचीही शक्यता असते. यामुळे या प्रकारांपासून वाचण्यासाठी काही उपकरणे बाजारात आहेत.

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम ही प्रणाली आता काही 10 लाखांच्या वरील कारमध्ये येऊ लागली आहे. यामध्ये कारच्या टायरमध्ये सेन्सर बसविलेले असतात.

याद्वारे टायरमधील हवेचा दाब चालकाला डिस्प्लेवर दिसतो. परंतू अशी सोय नसलेल्या कारमध्ये काय करायचे, तर बाहेरून टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिममही कारमध्ये बसविता येते.

साधारण 250 ते 5 हजार रुपयांपर्यंत ही प्रणाली मिळते. 250 रुपयांची प्रणाली म्हणजे केवळ टायर व्हॉल्वला कॅप लावलेली असते. ती हवेच्या दाबानुसार लाल, हिरवा रंग बदलते.

4-5 हजार रुपयांना मिळणारी ही प्रणाली आतमध्ये चारही टायरमधील हवेचे प्रेशर डिजिटली दाखविते. यासाठी एक छोटासा डिस्प्ले असतो.

ही प्रणाली बसविण्यासाठी आधी टायर खोलावा लागतो. यानंतर रिमला आतल्याबाजुने या प्रणालीचा सेन्सर बसवावा लागतो.

हे सेन्सर मागे-पुढे, डाव्या-उजव्या चाकाला त्यांच्यावर लिहिलेले असते त्याप्रमाणेच बसवावे.

कारण तसेच ते डिस्प्लेवरही असतात. अन्यथा चाकांची पोझिशन चुकेल.

हे सेन्सर टायरच्या व्हॉल्वला बसवावे लागतात.