ही कार धावते ताशी 482 किलोमीटर वेगाने!

By ऑनलाइन लोकमत on Mon, November 06, 2017 9:44pm

अमेरिकेतील लास वेगासमध्ये सेमा ऑटोमोटिव्ह शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये अनेक कार कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी अमेरिकेतील नामांकित कार कंपनी हेनेसीने आपल्या सर्वाधिक वेगवान व्हेनम एफ5 कारचे (Hennessey Venom F5 ) प्रात्यक्षिक दाखविले.
नवीन डिझाईन आणि स्टाईलवाली या हायपरकारला हेनेसी कंपनीने जगातील सर्वाधिक वेगवान कार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, जगातील सर्वाधिक वेगवान म्हणून कार कोएनिगसेग अगेरा आरएस आहे. ही कार जास्तीत जास्त ताशी 444.6 किलोमीटर वेगाने धावते. तसेच, या कारची गिनिज बुकात नोंद करण्यात आली आहे.
तसेच, कारला नवीन लुक आणि खास टायर वापरले आहेत. ट्विन टर्बो व्ही8 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जबरदस्त असून 1600 बीएचपी इतक्या क्षमतेची पॉवर निर्माण करु शकते.
दरम्यान, हेनेसी व्हेनम एफ 5 कार जगातील फक्त 24 युनिटमध्ये बनविण्यात आली आहे. या कारची किंमत 1.6 मिलीयन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतात 10 कोटी 34 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

संबंधित

ही बाईक धावत नाही, उडते; पण किंमत ऐकून तुम्हीही उडाल!
कोल्हापुरात ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’चा थरार, सर्वांचे लक्ष घेतले वेधून
आश्चर्यकारक डिझाईन असलेले 'हे' स्मार्टफोन्स कधी पाहिलेत का?
तब्बल साडेसहा कोटींची कार!; अवघ्या 2 सेकंदात 100 किमी वेग पकडणार
मोबाइलची बॅटरी टिकवून ठेवण्यासाठी हे करा उपाय

ऑटो कडून आणखी

Auto Expo 2018 : ह्युंदाईच्या 'स्वच्छ कॅन' लाँचवेळी लावली शाहरुख खानने हजेरी
#AutoExpo2018 : देशातील पहिली इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा किती आहे बुकींग अमाउंट
जाणून घ्या स्विफ्ट कारचा 2005 पासूनचा आतापर्यंतचा भारतातील प्रवास
#AutoExpo2018 : मोठ्या प्रतिक्षेनंतर मारुती सुझुकीची Next Gen Swift भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
AutoExpo2018 : सुझुकीने लाँच केल्या Intruder, GSX-S750 आणि Burgman या बाईक्स, पाहा फोटोज

आणखी वाचा