या आहेत भारतातील टॉप ट्रेंड झालेल्या बाईक्स....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:46 PM2018-12-19T16:46:44+5:302018-12-19T16:54:21+5:30

भारतातील दुचाकी कंपन्यांसाठी 2018 हे वर्ष खूपच चांगले गेले आहे. या वर्षात लोकांनी इंटरनेटवरही नव्याबाईक मोठ्या प्रमाणावर सर्च केल्या. यावरून गुगलनेही टॉप ट्रेंडमध्ये असलेल्या बाईक्सची यादी जाहीर केली आहे...

जुन्या पिढीची मने जिंकणारी जावा बाईक पुन्हा आली आहे. या बाईकने बुलेटवर प्रेम असणाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. जावा हा ब्रँड महिंद्राने पुन्हा भारतात आणला आहे. सध्या कंपनी ऑनलाईनद्वारे बुकिंग स्वीकारत असून गुगलवर गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर ट्रेंड झाली आहे.

गुगलने हे स्पष्ट नाही केले की, टीव्हीएसच्या अपाचे या बाईकचे कोणते मॉडेल ट्रेंडमध्ये होते. कदाचित अपाचे RTR 160 4V ही नवीन बाईक आणि RTR 200 4V ही बाईक असू शकते. 160 सीसीच्या रेंजमध्ये RTR 200 4V ही बाईक सर्वात पसंतीची आहे. या बाईकला ड्यूअल-चॅनेल ABS अपडेट करण्यात आले आहे.

अॅव्हरेज सेल्स होऊनही सुझुकीची इंट्रुडरमध्ये नेटकऱ्यांनी मोठे स्वारस्य दाखवले आहे. सुझुकीची इंट्रुडर आणि हिरोची एक्सपल्स 200 या दोन अशा बाईक आहेत ज्या गेल्यावर्षीही टॉप ट्रेंडिंगमध्ये होत्या.

Ntorq 125 ही स्कूटर देशातील सर्वाधिक खप असलेली स्कूटर आहे. किंमतीनुसारही चांगली आहे. शार्प आणि स्पोर्टी स्टाईल आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन असिस्ट फिचर्स आहेत.

सुझुकीची बर्गमन स्ट्रीट ही स्कूटरही ट्रॉप ट्रेंडमध्ये होती. भारतात ही एकमेव मॅक्सी स्टाईल स्कूटर आहे. यामुळे काहीसे वेगळे हवे असलेल्या लोकांसाठी हा चांगला पर्य़ाय आहे.

भारतात हिरोच्या मोटारसायकलशिवाय कोणतीही लिस्ट पूर्ण होत नाही. हिरो एक्सट्रीम या बाईकची किंमतही 160 सीसीच्या बाईकच्या आसपास आहे.

टीव्हीएसची Radeon ही तिसरी अशी गाडी आहे जी टॉप ट्रेंडमध्ये आहे. हिरो होंडाच्या सीडी 100 च्या लूकमध्ये असलेल्या या बाईकची विक्रीही मोठी आहे.

हिरोच्या 125सीसीच्या सेगमेंटमध्ये या स्कूटरची मोठी मागणी आहे. ही एकमेव स्कूटर आहे ज्याच्यामध्ये स्टार्ट-स्टॉप सिस्टिम देण्यात आली आहे.

हिरोच्या Xpulse 200 नेही इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बाईकची किंमत भारतात कमी आहे. लाँच होण्यासाठी लागलेल्या वेळामुळे लोकांनी या बाईकला मोठ्या प्रमाणावर सर्च केले आहे. 2019 च्या सुरुवातीला ही बाईक लाँच होईल.

गुगलच्या लिस्टमध्ये सर्वात शेवटी जागा मिळविणारी BMWची ही पिहली बाईक आहे जिचे उत्पादन भारतात झाले आहे. मोठ्या किंमतीमुळेही ही बाईक चर्चेत राहिली होती. BMW G 310 R ची किंमत 2.99 लाख असताना G 310 GS ची किंमत 3.49 लाख ठेवण्यात आली आहे.