#AutoExpo2018 : मारुती सुझुकीची कॉन्सेप्ट फ्युचर एस झाली लाँच, पाहा काय आहेत फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 09:29 AM2018-02-07T09:29:49+5:302018-02-07T09:43:14+5:30

Maruti Suzuki ने 201दिल्लीत ऑटो एक्सपो २०१८मध्ये मारुती सुझुकीने आपली पहिलं इलेक्ट्रिक कारच्या संकल्पनेतलं मॉडल e-Survivor आज लाँच केलं. दोन व्यक्तींसाठीची ही एक ओपन टॉप स्पोर्टस युटीलिटी कार आहे.

या कारची निर्मिती फ्युचरिस्टिक संकल्पनेवर केली गेली आहे. तसंच या कारमध्ये नव्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा पुरेपुर वापर करण्यात आला आहे.

या कारच्या लाँचच्यावेळी मारुती सुझुकीचे एम.डी. आणि सीईओ अयुकावा म्हणाले की, ‘भारतीय ग्राहकांना गाडीमधला सोईस्करपणा आणि कंम्फर्ट गरजेचा असतो. त्यांना प्रत्येक कारमध्ये त्या सोई व सुविधा हव्या असतात आणि मारुती सुझुकी कायम त्याच दिशेनं प्रयत्न करत असतं.’

मारुती सुझुकीसुध्दा आपल्या कंपनीत इलेक्ट्रिक कार, चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर आणि बॅटरी रिसायकलिंगच्या दृष्टीनेही वेगाने काम करत आहे. तसंच २०२०मध्ये अशी कार भारतात लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे.