तुम्हीच पाहा... जिल्हाधिका-यांनी कसे हुसकावले आंदोलक ठेकेदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:37 PM2018-05-24T12:37:15+5:302018-05-24T12:37:15+5:30

बुधवारी महापालिकेच्या आवारात उपोषणास बसलेल्या ठेकेदारांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या बाहेर हुसकावून लावले.

इमारतीच्या आतील जागा आंदोलनाची नाही. आवारात आंदोलन सुरू असताना सुरक्षा रक्षक काय करीत होते, असे खडे बोलही जिल्हाधिका-यांनी सुनावले.

जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी हे महापालिकेतील कामकाज उरकून बाहेर निघाले होते. उपोषण करण्याची ही काही जागा नाही. मी तुमच्याशी चर्चा करणार नाही. महापालिकेचे सुरक्षा रक्षक काय करीत आहेत?

आंदोलन करायचे असेल तर ते थेट महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करा, अशा शब्दात जिल्हाधिका-यांनी ठेकेदारांना ठणकावले.

त्यानंतर ठेकेदारांनी त्यांचे बस्तान थेट महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर हलविले.त्यामुळे उपोषणार्थी ठेकेदारांना त्यांचे बस्तान रस्त्यावर हलवावे लागले.

त्यानंतर ठेकेदारांनी त्यांचे बस्तान थेट महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर हलविले.त्यामुळे उपोषणार्थी ठेकेदारांना त्यांचे बस्तान रस्त्यावर हलवावे लागले.

त्यानंतर महापालिका प्रवेशव्दाराच्या बाहेर सुरु असलेले आंदोलन दुस-या दिवशीही सुरुच होते.