अहमदनगर जिल्ह्यात महाश्रमदानासाठी संचारलं गावागावात तुफान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 07:22 PM2018-05-02T19:22:28+5:302018-05-02T19:22:55+5:30

पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या नगर तालुक्यातील सारोळा कासार महाराष्ट्र दिनी आयोजित महाश्रमदानासाठी सुमारे ४ हजार जलमित्रांनी हजेरी लावत श्रमदान केले.

नगर तालुक्यातील चिचोंडी , डोंगरगण, मांजरसुंबा , दश्मी गव्हाण या गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले.

पारनेर तालुक्यातील गटेवाडी गावात झालेल्या महाश्रमदानात सुमारे १ हजार जलमित्रांनी सहभाग नोंदवला. याशिवायबाभुळवाडे येथे सुमारे २०० जलमित्रांनी महाश्रमदानात सहभाग घेतला.

पारनेर तालुक्यातील गावागावांतील ग्रामस्थांमध्ये श्रमदानाचं तुफान संचारलं होतं. पानोली येथे १०० जलमित्रांसह राज्य युवा परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या युवकांनी श्रमदान केलं.

पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे २०० जलमित्रांनी श्रमदानाला सुरुवात केले. बाहेरगावी असणा-या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून गावातील ग्रामस्थांना स्फूर्ती दिली.