Mahashivratri2018 : एका क्लिकवर पाहा 12 ज्योतिर्लिंग

By ऑनलाइन लोकमत on Tue, February 13, 2018 1:05pm

जगभरातील समस्त शिवप्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यामुळे या दिवशी करायची व्रत-वैकल्ये, पूजा आणि मुहूर्त याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. आज (मंगळवार) महाशिवरात्री आहे. महादेवांच्या भारतातील प्रमुख 12 मंदिरांना 12 ज्योतिर्लिंगे म्हणतात.
गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेलेसोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीनतीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो
रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍रीतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
श्री महांकालेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिमा दक्षिणमुखी आहे. बारा ज्योतिर्लिंगात दक्षिणमुखी पूजेचे महत्वामुळे फक्त महांकालेश्वर येथेच भस्म आरतीहोते. वर्षात केवळ एकदा महाशिवरात्रिच्या दुसर्या दिवशी भगवान श्री महांकालेश्वरांची दुपारी बारा वाजता भस्म आरती होते .
ॐकारेश्वर ची निर्मिती नर्मदा नदी पासून झाली आहे. ही नदी भारताची अत्यंत पवित्र नदी आहे. राजा मान्धाता ने येथे नर्मदा किनारी घोर तपस्या करून भगवान शिव ला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. येथे एकूण ६८ तीर्थ असून येथे ३३ कोटी देवता राहतात अशी कल्पना आहे.
- भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत.
`भीमा' नदीचा उगम आणि श्री महादेवाचे - शंकराचे स्थान, म्हणून याला `भीमा-शंकर' असे म्हणतात. भीमाशंकर हे एक थंड हवेचे ठिकाण असून मंदिराच्या आजुबाजुचा परिसर - डोंगरदर्‍यांनी युक्त, दाट जंगलांचा असा - निसर्गरम्य आहे. हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. विशाल नंदी व १००० फुट लांब , ६५० फुट रुंद आणि १२५ फुट उंच असे रामेश्वर चे मंदिर आहे. वार्षिक उत्सवाच्या वेळेस भगवान शंकर व पार्वती ची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते.
पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर असून याचा विस्तार ६०,००० चौ. फूट एवढा प्रचंड आहे.
शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते.पूर्वी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिर होते. वाराणसी भारताची सांस्कृतिक राजधानी असून ते भारताची पवित्र नदी गंगाच्या किनार्यावर वसलेले आहे. शहराच्या मध्यावर विश्वीनाथ मंदिर असून तेथे भगवान शिव, विश्वेतश्वगर किंवा विश्वेनाथ ज्याकतिर्लिंग स्थापलेले आहे.
या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते.याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते.
भगवान विष्णू साठी त्यांनी या स्थानाचा त्याग केला आणि केदारनाथ मध्ये वास्तव्य केले. या ठिकाणी शंकराचार्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी समाधी घेतली. केदारनाथ हे ज्योतिर्लिंगा बरोबरच चार धामा पैकी एक धाम आहे. प्रतिकूल हवामानामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतच दर्शनासाठी खुले असते.
घृष्णेश्र्वराचे मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आहे. या मंदिरापासून जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठापैकी एक लक्षविनायक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या घराचे अवशेष (जुना वाडा) देखील मंदिराजवळ आहेत.

आणखी वाचा