परभणी :शेतकऱ्यांमध्ये भांडण कशाला लावता? राहुल पाटील यांचा बबनराव लोणीकर यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:02 AM2019-05-12T00:02:02+5:302019-05-12T00:04:48+5:30

निम्न दुधना प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने परभणीला १५ दलघमी पाणी सोडले तरी इतर ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सहकार्य करा. जालना आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भांडणं कशाला लावता, असा सवाल शिवसेनेचे आ.राहुल पाटील यांनी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना केला आहे.

Why fight with farmers? Question of Rahul Patil's Babanrao Looneykar | परभणी :शेतकऱ्यांमध्ये भांडण कशाला लावता? राहुल पाटील यांचा बबनराव लोणीकर यांना सवाल

परभणी :शेतकऱ्यांमध्ये भांडण कशाला लावता? राहुल पाटील यांचा बबनराव लोणीकर यांना सवाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निम्न दुधना प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने परभणीला १५ दलघमी पाणी सोडले तरी इतर ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सहकार्य करा. जालना आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भांडणं कशाला लावता, असा सवाल शिवसेनेचे आ.राहुल पाटील यांनी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना केला आहे.
निम्न दुधना प्रकल्पातून परभणी, सेलू, मानवत व जिंतूर तालुक्यातील गावांना पिण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी लावून धरली आहे. या अनुषंगाने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला होता. याला जालना जिल्ह्यातील राजकीय नेते व काही शेतकरी विरोध करीत आहेत. शुक्रवारी धरणाच्या पायथ्याशी पाणी सोडण्यास विरोध करणाºया आंदोलकांसमोर बोलताना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झालेला नाही व नदीपात्रात पाणी सोडू देणार नाही. बॅकवॉटरमधील मोटारी कदापि काढू दिल्या जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. या संदर्भात बोलताना परभणीचे शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले की, धरणाची निर्मितीच मुळात कमांड एरियासाठी झालेली आहे.
शिवाय धरणात सध्या मुबलक पाणी आहे. परभणीसाठी १५ टीएमसी पाणी सोडले तरी त्याचा इतर योजनांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांमध्ये वाद कशाला लावता, असा सवाल पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांना करून परभणीचे संपर्कमंत्री म्हणून दुष्काळाने व्याकुळ झालेल्या जिल्हावासियांना पाणी देण्याची तुमची जबाबदारी नाही का, असा सवालही आ.डॉ.पाटील यांनी केला आहे. बॅकवॉटरमध्ये अनधिकृत मोटारीद्वारे उपसा सुरु आहे. त्यालाही आमची हरकत नाही. तरीही तुम्ही राजकारण कशासाठी करता आहात, असेही ते म्हणाले. खुद्द पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्यास हरकत नसल्याचे लेखी वरिष्ठांना कळविले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जनतेच्या भावना व गरजा लक्षात घेऊन सर्व शेतकरी लोणीकर यांनी एकसमान समजावेत व सकारात्मक भूमिका घेऊन पाणी सोडण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आ.डॉ.पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इतर नेत्यांची पाणी सोडण्याबाबत अस्पष्ट भूमिका
निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी आ.राहुल पाटील यांनी लावून धरली आहे. काही नेत्यांनी गेल्या महिन्यात या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते; परंतु, सक्रिय भूमिका मात्र अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
दुसरीकडे नदीपात्रात पाणी सोडण्यास पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, काँग्रेसचे माजी आ.सुरेश जेथलिया यांच्यासह जालन्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. शिवाय परभणी जिल्ह्यातील सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनीही विरोधाची भूमिका घेतली आहे.

Web Title: Why fight with farmers? Question of Rahul Patil's Babanrao Looneykar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.