खोदकाम काम करताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळुन चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:56 PM2019-01-21T13:56:46+5:302019-01-21T13:57:23+5:30

शेख शकिल शेख जानिमिया (वय 30 ) असे मृत चालकाचे नाव आहे.

While digging the well by tractor, the driver died due to collapsing in the well | खोदकाम काम करताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळुन चालक ठार

खोदकाम काम करताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळुन चालक ठार

googlenewsNext

सेलु (परभणी ) : तालुक्यातील हादगाव (खु ) शिवारातील एका शेतात विहिरीचे खोदकाम खुरु असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळुन चालक जागीच ठार झाला. शेख शकिल शेख जानिमिया (वय 30 ) असे मृत चालकाचे नाव असून ही घटना रविवारी दुपारी 11:30 वाजता घडली. 

या बाबत अधिक माहिती अशी की, हादगाव खु. शिवारातील भिकन अंभोरे यांच्या गट क्र. 81 मधील शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु आहे. रविवारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालक शेख शकिल शेख जानिमिया हे विहिरीचे खोदकाम करत होते. यावेळी ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ते ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळले. यात चालक शेख शकिल यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी शेख चांद शेख अहमद यांच्या फिर्यादीवरुन मृत चालकाविरुद्ध निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक डॉ. नितिन काशिकर हे करत आहेत.

Web Title: While digging the well by tractor, the driver died due to collapsing in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.