परभणी जिल्ह्यातील पावणेदोन लाख शेतकऱ्यांची नावे अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:51 PM2019-06-23T23:51:51+5:302019-06-23T23:52:49+5:30

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत महसूल प्रशासनाने १३ व १४ जून रोजी जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानंतर या योजनेसाठी १ लाख ७३ हजार २२९ शेतकरी कुटूंबियांची नावे किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत़

Upload names of Pavanodon lakh farmers in Parbhani district | परभणी जिल्ह्यातील पावणेदोन लाख शेतकऱ्यांची नावे अपलोड

परभणी जिल्ह्यातील पावणेदोन लाख शेतकऱ्यांची नावे अपलोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत महसूल प्रशासनाने १३ व १४ जून रोजी जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानंतर या योजनेसाठी १ लाख ७३ हजार २२९ शेतकरी कुटूंबियांची नावे किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत़
केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी थेट अनुदान योजना जाहीर केली आहे़ तीन महिन्यांतून एक वेळा २ हजार रुपये या प्रमाणे प्रत्येक शेतकरी कुटूंबियाच्या खात्यावर वर्षभरातून ६ हजार रुपये अनुदान या योजनेंतर्गत जमा केले जाणार आहे़ त्यासाठी शेतकरी कुटूंबियांची नावे किसान पोर्टलवर अपलोड करण्याचे काम महसूल प्रशासनाच्या वतीने केले जात आहे़ योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात शेतकरी कुटंूबियांची यादी तयार करून महसूल प्रशासनाने १ लाख ५९ हजार ३६९ शेतकरी कुटूंबियांची नावे किसान पोर्टलवर यापूर्वीच अपलोड केली होती़ मध्यंतरी शासनाने या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला आहे़ पूर्वी योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांनाच या योजनेचा लाभ दिला जात होता़ मात्र योजनेंतर्गत असलेली क्षेत्र मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे निश्चितच लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे़ क्षेत्र मर्यादेची अट रद्द झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकºयांची नव्याने यादी बनविण्याचे काम हाती घेतले़ त्यासाठी निश्चित कार्यक्रमही जाहीर केला होता़ १३ आणि १४ जून रोजी जिल्हाभरात शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले़ ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यकांनी थेट गावात जाऊन पात्र शेतकरी कुटूंबियांची यादी तयार केली आहे़ ही यादी तहसीलस्तरावर जमा करण्यात आली असून, पात्र शेतकºयांची नावे किसान पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ३६९ शेतकºयांची नावे यापूर्वीच अपलोड करण्यात आली होती़ दोन दिवसांच्या सर्वेक्षणामध्ये ३२ हजार ४७९ नवीन पात्र शेतकºयांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे़ या शेतकºयांची नावेही किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, आता परभणी जिल्ह्यातून १ लाख ७३ हजार २२९ शेतकºयांची नावे या योजनेच्या लाभासाठी किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत़ आणखी १ लाख ८ हजार ३४४ शेतकºयांची नावे अपलोड करण्याचे काम शिल्लक आहे़ जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या शेतकºयांचे सर्वेक्षण करून ही नावे येत्या काही दिवसांत पोर्टलवर अपलोड केली जाणार आहेत़ सद्यस्थितीत किसान पोर्टलवर अपलोड झालेल्या नावांच्या यादीनुसार शेतकरी सन्मान योजनेसाठी पावणे दोन लाख शेतकरी पात्र ठरले आहेत़
जिल्ह्यात ४ लाख २४ हजार खातेदार
४जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या यादीची निवड करण्यासाठी सुरुवातीला शेतकरी खातेदारांची यादी तयार केली़ त्यात परभणी जिल्ह्यामध्ये ४ लाख २४ हजार ९०१ खातेदार शेतकरी असून, ३ लाख २८ हजार ७२१ एवढी कुटूंब संख्या आहे़ या कुटूंबांपैकी ४ हजार ७७० कुटूंब योजनेच्या निकषात बसत नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहेत़ तर ३२ हजार ४७९ नवीन नावे या योजनेत समाविष्ट झाली आहेत़ या नावांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़
१३ हजार कुटूंब गावाबाहेर
४कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून दोन दिवस करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये काही शेतकरी प्रत्यक्ष गावात वास्तव्याला नसल्याची माहिती पुढे आली आहे़
४जिल्ह्यातील १३ हजार १७ शेतकरी पर जिल्ह्यात वास्तव्याला आहेत़ त्यामध्ये सेलू तालुक्यात २ हजार ६३८, पाथरी २ हजार २६७, मानवत ९७२, सोनपेठ १ हजार २०३, गंगाखेड २ हजार ४७१, पालम १ हजार ६९५ आणि पूर्णा तालुक्यातील १ हजार ७४४ शेतकरी कुटूंब पर जिल्ह्यात वास्तव्याला असल्याची माहिती प्रशासनाने दिली़

Web Title: Upload names of Pavanodon lakh farmers in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.