परभणी मनपाने मागविल्या निविदा:दहा लाख रुपयांतून औषधींची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:47 AM2018-11-19T00:47:09+5:302018-11-19T00:47:27+5:30

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली असून १० लाख रुपयांची विविध औषधी मागविली आहे. ही औषधी उपलब्ध झाल्यानंतर शहरात पुढील तीन वर्षापर्यंतचा औषधसाठा उपलब्ध होणार आहे.

Tender bid for Parbhani Manappa: purchase of medicines at Rs. 10 lakhs | परभणी मनपाने मागविल्या निविदा:दहा लाख रुपयांतून औषधींची खरेदी

परभणी मनपाने मागविल्या निविदा:दहा लाख रुपयांतून औषधींची खरेदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली असून १० लाख रुपयांची विविध औषधी मागविली आहे. ही औषधी उपलब्ध झाल्यानंतर शहरात पुढील तीन वर्षापर्यंतचा औषधसाठा उपलब्ध होणार आहे.
महापालिकेच्या अंतर्गत कल्याण मंडपम् येथे रुग्णालय असून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सहा आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत. या आरोग्य केंद्रांमधून सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी या सारख्या किरकोळ आजारांवर उपचार केले जातात. मात्र मागील काही वर्षांपासून पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचार करताना महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सहाही आरोग्य केंद्रांमध्ये येणाºया रुग्णांची संख्या अधिक असून सातत्याने औषधाचा तुटवडा जाणवत असल्याने त्यावर उपाय काढण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया मागविली आहे.
जंत गोळ्या, थंडीताप, जुलाब आदी आजारांवर उपचार करण्यासाठी ३२८ प्रकारची औषधी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. यात अ‍ॅन्टी बायोटीक, टॅबलेटस्, वेगवेगळ्या प्रकारणी सिरीज आणि सीरप औषधींचा समावेश आहे. महापालिकेने अधिकृत कंपन्यांकडून निविदा प्रक्रिया मागविली आहे. छोट्या आजारांवर तात्काळ उपचार करण्याच्या उद्देशाने मनपाने ही औषधी मागविली असून ती उपलब्ध झाल्यास तीन वर्षाचा औषध साठा मनपाच्या आरोग्य विभागात उपलब्ध होईल. परिणामी रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.
विविध आजारांची औषधी उपलब्ध
४आरोग्य विभागाच्या पाठपुराव्यानंतर मागील आठवड्यात महापालिकेत विविध आजारांची औषधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे औषधींचा तुटवडा दूर झाला आहे. महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजुलाला, सभागृहनेते भगवान वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापती सचिन देशमुख यांनी औषधींसाठी पाठपुरावा केला. आरोग्य अधिकारी डॉ.आरती देऊळगावकर यांच्यासह गजानन जाधव, अमोल सोळंके, एस.एस.सॅम्यूलस्, वैजनाथ कदम आदींनी उपलब्ध झालेल्या औषधींची मोजदाद सुरु केली असून हा औषधीसाठा कल्याणनगर येथील मनपाच्या रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
उपलब्ध झालेली औषधी
४हापकीन बायोफार्मासिटीकल कंपनीचे सिरप पॅरॉसिटामॉल १५ हजार बॉटल (तापीसाठी), हिंदूस्थान लॅबरोटरिजचे कफ सिरप २३ हजार ५०० बॉटल (खोकला, सर्दीसाठी), हिंदूस्थान लॅबरोटरिजचे मेट्रोनिडयाझोल २५ हजार गोळ्या (जुलाब, पोट दुखीसाठी), हिंदूस्थान लॅबरोटरिजच्या सेप्ट्रॉन गोळ्या ३० हजार (ताप,सर्दी, खोकला, जुलाब आदी आजारांसाठी).
मागील दोन वर्षांपासून महापालिकेला औषधींचा तुटवडा जाणवत होता. या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे औषधी खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. निविदा प्रक्रियेतून प्रतिसाद मिळाला नाही तर राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन औषधी खरेदी करण्याची तयारी केली आहे. मागील आठवड्यात काही औषधी उपलब्ध झाली असृून आणखी एक लॉट मिळणार आहे. आरोग्य केंद्रांच्या मागणीप्रमाणे ही औषधी वितरित केली जाईल.
-सचिन देशमुख,
आरोग्य सभापती, मनपा

Web Title: Tender bid for Parbhani Manappa: purchase of medicines at Rs. 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.