परभणी जिल्हा परिषद शाळेच्या भिंती लोकसहभागातून झाल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:48 AM2019-06-27T00:48:15+5:302019-06-27T00:48:25+5:30

शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत लोकसहभागातून शहरातील मन्नाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींची रंगरंगोटी करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. त्याच बरोबर भौतिक सुविधांची उपलब्धता व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या जि.प. शाळेत प्रवेश घेतले आहेत.

Speaker of the Parbhani Zilla Parishad School from the people's participation | परभणी जिल्हा परिषद शाळेच्या भिंती लोकसहभागातून झाल्या बोलक्या

परभणी जिल्हा परिषद शाळेच्या भिंती लोकसहभागातून झाल्या बोलक्या

Next

अन्वर लिंबेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत लोकसहभागातून शहरातील मन्नाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींची रंगरंगोटी करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. त्याच बरोबर भौतिक सुविधांची उपलब्धता व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या जि.प. शाळेत प्रवेश घेतले आहेत.
गंगाखेड शहरातील मन्नाथनगरात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत १६५ विद्यार्थी शिक्षण घेतात. जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत असल्याने या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक कचखाऊ भूमिका घेत होते. मात्र शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव फड यांनी शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी करण्याचा संकल्प करीत लोकसहभागातून निधी गोळा केला. त्यानंतर शाळेची दुरुस्ती व भिंती रंगवून या भिंतीवर इंग्रजी, मराठी बाराखडी, उजळणी, पसायदान, राष्टÑगीत, आठवड्यातील दिवस, तालुके, वेगवेगळ्या खंडांची नावे, भारताचे संविधान, प्रतीज्ञा, राष्टÑीय प्रतिके, मूल्य शिक्षणाची माहितीची चित्रे रेखाटून भिंती बोलक्या केल्या आहेत. त्याच बरोबर शाळेतील वर्गखोल्यांच्या छताला आकाशाचे स्वरुप देत त्यावर चांदण्या व विविध गृहांची चित्रे रेखाटली. शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करीत शाळेचे डिजीटलायजेशन केले आहे. त्यामुळे गतवर्षी शाळेत १०९ विद्यार्थ्यांची पटसंख्या होती. आता ती १६५ वर जाऊन पोहचली आहे. रात्रीचे अभ्यास वर्ग सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे.

Web Title: Speaker of the Parbhani Zilla Parishad School from the people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.