परभणीत महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:29 AM2019-04-18T00:29:06+5:302019-04-18T00:29:23+5:30

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच जैन मंदिरामध्ये अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम पार पडले.

Shobhayatra for Mahavir Jayanti during Parbhaniit Mahavir Jayanti | परभणीत महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

परभणीत महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच जैन मंदिरामध्ये अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम पार पडले.
बुधवारी परभणी शहरात भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आनंदनगर येथील नेमीनाथ दिगंबर जैन मंदिरात सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण झाले. त्यानंतर आनंदनगर ते भजनगल्लीपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भजनगल्ली येथून सकाळी सव्वा आठ वाजता भगवान महावीर यांच्या प्रतिमेच्या शोभायात्रेला प्रारंभ झाला. नानलपेठ, शिवाजी चौक, गांधी पार्क, माळी गल्ली आणि परत गांधी पार्क येथील जैन स्तंभाजवळ या शोभायात्रेचा समरोप झाला. यावेळी नवनिर्माणाधिन स्तंभाची पूजा करण्यात आली. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, महापौर मीनाताई वरपूडकर, क्रांतीताई जाधव, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, राजेश विटेकर, मनपातील सभागृहनेते भगवान वाघमारे, नगरसेवक सचिन अंबिलवादे, अमोल जाधव, नगरसेविका उषाताई झांबड, गेंदमल बांठिया, झेड.आर. मुथा, विजय कुचेरिया, विजय कांकरिया, महेश दुग्गड, पवन अंभुरे, पवन झांझरी, मुकेश जैन, दर्शन कळमकर, अजित मोगले, राजेश भटेवडा, बंडू संघई, वसंतराव अंभुरे, प्रशांत सावजी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर आनंदनगर येथील नेमीनाथ दिगंबर जैन मंदिर, भजनगल्लीतील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, सुभाष रोडवरील गोडी पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
पूर्णा, सेलू, मानवतमध्ये कार्यक्रम
पूर्णा, मानवत, सेलू तालुक्यातही बुधवारी भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ पूर्णा येथे जैन मंदिरापासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली़ त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले़ सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी घेण्यात आले़ रतन सायरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जि़प़ शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले़ मानवत येथेही शहरातून शोभायात्रा काढण्यात आली़ पेठ गल्लीतील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर यांचा पंचामृत अभिषेक व जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम पार पडला़ जयंतीनिमित्त चित्रकला व इतर स्पर्धा घेण्यात आल्या़ सेलू येथे जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडले़ शहरातून काढलेल्या शोभायात्रेत महिला, युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ यानिमित्त शहरात विविध स्पर्धाही पार पडल्या़

Web Title: Shobhayatra for Mahavir Jayanti during Parbhaniit Mahavir Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.