सेलूत रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:20 PM2018-07-02T13:20:57+5:302018-07-02T13:21:30+5:30

देऊळगाव —डासळा,लाडनांद्रा —अाष्टी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत शिवसेनेच्यावतीने आज सकाळी देऊळगाव पाटी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

Sena's movement demanded to repair the road | सेलूत रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन

सेलूत रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन

Next


सेलू (परभणी ) : देऊळगाव —डासळा,लाडनांद्रा —अाष्टी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत शिवसेनेच्यावतीने आज सकाळी देऊळगाव पाटी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक तास चालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

देऊळगाव —डासाळा—लाडनांद्रा—अाष्टी या रस्त्याची जागोजागी चाळणी झाली आहे.  यामुळे खवणे पिंपरी, राधेधामणगाव, डासाळा, लाडनांद्रा,देऊळगाव या पाच गावच्या दळण वळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुख्यत: शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांना याचा मोठा त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणी करत ग्रामस्थ व शिवसेनेतर्फे आज सकाळी देऊळगाव पाटी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते राम खराबे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रल्हाद कोरे यांनी पुढील तीन दिवसात रस्ता दूरूस्तीचे काम हाती घेतले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात  शिवसेनेचे तालुका प्रमुख रणजित गजमल, गोपाळ कदम, चंद्रकांत कदम, शिवाजी चव्हाण, शिवाजी गायकवाड, भूजेंग जाधव, अाबा खुरूसने, सुधाकर साखरे, प्रल्हाद गोरे, गजानन साखरे, शिवाजी कदम, सचिन शेलार,सिध्दू मगर यांच्यासह मोठ्याप्रमाणावर ग्रामस्थांचा सहभाग होता. 

Web Title: Sena's movement demanded to repair the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.