परभणी जिल्ह्यात साडेदहा हजार हेक्टरवर होणार बीजोत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:01 AM2018-04-23T01:01:00+5:302018-04-23T01:01:00+5:30

२०१८-१९ या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना प्रमाणित व दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Seed Production in Parbhani district will be done on 1,00,000 hectares | परभणी जिल्ह्यात साडेदहा हजार हेक्टरवर होणार बीजोत्पादन

परभणी जिल्ह्यात साडेदहा हजार हेक्टरवर होणार बीजोत्पादन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : २०१८-१९ या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना प्रमाणित व दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
खरीप हंगाम हा जिल्ह्यातील शेतकºयांची आर्थिक वाहिनी म्हणून समजला जातो. या हंगामात शेतकरी सोयाबीन, तूर, उडीद, मूग व नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाची जवळपास ५ लाख हेक्टर क्षेत्रवर लागवड करतात. लागवड केलेल्या पिकातून होणाºया उत्पादनातून वर्षभराची आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षापासून सुलतानी व अस्मानी संकटाचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.
गेल्या काही वर्षात शेतकºयांना बोगस बियाणांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटातून बचावलेल्या शेतकºयांना निकृष्ट बियाणांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी २०१८-१९ च्या खरीप हंगामात तूर, मुग, सोयाबीन, उडीद, सुधारित बाजारा व ज्युट या पिकांच्या लागवडीसाठी प्रमाणित व दर्जेदार बियाणे मिळावे, यासाठी गेल्या दोन वर्षापासून राज्य शासन व बियाणे महामंडळाच्या वतीने बीजोत्पादन कार्यक्रम अंमलात आणला. या कार्यक्रमातून शेतकºयांना बियाणे महामंडळाकडून बियाणे उपलब्ध करुन दिले जाते. या बियाणातून होणारे उत्पन्न महामंडळ व शेतकरी पुढील खरीप हंगामात पेरणीसाठी उपलब्ध करुन देतात. यावर्षी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने जिल्ह्यातील बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत साडेतीन हजार शेतकºयांना बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील साडेदहा हजार हेक्टर क्षेत्र बिजोत्पादन कार्यक्रमासाठी प्रस्तावित केले आहे. यामध्ये सोयाबीनसाठी ९५०० हेक्टर क्षेत्र, तुरीसाठी २०० हेक्टर, मुगासाठी १०० हेक्टर, उडदासाठी ५० हेक्टर, सुधारित बाजरीसाठी १०० हेक्टर, ज्युट पिकासाठी ५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामासाठी प्रमाणित व दर्जेदार बियाणे उपलब्ध होणार आहेत.
गतवर्षी ५५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध
२०१७-१८ या खरीप हंगामापासून राज्य शासन व बियाणे महामंडळाकडून बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे. २०१७-१८ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, अवेळी झालेल्या पावसामुळे बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत असलेल्या पिकाला फटका बसला. तरी सुद्धा या कार्यक्रमांतर्गत बियाणे महामंडळाकडे ५५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. हे बियाणे २०१८-१९ च्या खरीप हंगामातील पेरणीसाठी वापरण्यात येणार आहे.

Web Title: Seed Production in Parbhani district will be done on 1,00,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.