परभणीकरांना भेडसावणार टंचाई : राहटीतील पाणी संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:28 AM2017-12-19T00:28:45+5:302017-12-19T00:29:36+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणीसाठा संपण्याची ही दुसरी वेळ आहे.

The scarcity to be settled for Parbhanikar: The water in the living room is over | परभणीकरांना भेडसावणार टंचाई : राहटीतील पाणी संपले

परभणीकरांना भेडसावणार टंचाई : राहटीतील पाणी संपले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणीसाठा संपण्याची ही दुसरी वेळ आहे.
परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. या बंधाºयात सिद्धेश्वर धरणामधून पाणी घेतले जाते. डिसेंबरमध्ये पहिल्याच आठवड्यात बंधाºयातील पाणी संपले होते, तेव्हा महानगरपालिकेने सिद्धेश्वर बंधाºयातून शहरासाठी पाण्याची मागणी नोंदविली. १ दलघमी पाणी राहटी बंधाºयात दाखल होईपर्यंत ३ दिवस शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागला.
राहटी बंधाºयात पाणी दाखल झाले खरे; परंतु, बंधाºयाचे गेट नादुरुस्त झाल्याने बंधाºयात आलेले अर्ध्याहून अधिक पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे बंधाºयातील पाणी वाहून गेल्याने या अधिकाºयांनी तातडीने दुरुस्ती केली. परंतु, शहरवासियांसाठी केवळ अर्धेच पाणी शिल्लक राहिले. त्यानंतर १५ ते २० दिवसातच शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली. आज मात्र हा बंधारा कोरडाठाक पडला आहे.
उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ होणे सहाजीक आहे; परंतु, हिवाळ्यातच शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
बंधाºयातील पाणीसाठा कमी होत असताना पाणी उपलब्ध करुन घेण्यासंदर्भात महापालिकेकडून पाठपुरावा झाला नाही. बंधाºयातील पाणी संपण्यापूर्वीच या बंधाºयात पाणीसाठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु, हे उपाय करताना महापालिका प्रशासन कमी पडले. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा बंधारा पूर्णत: कोरडा झाला आहे. त्यामुळे बंधाºयातून पाणी उपसा करणारे विद्युतपंप दिवसभर बंद राहिले. परिणामी मंगळवारपासून शहरवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
पाटबंधारे विभागाने दिला नकार
राहटी बंधाºयात यापूर्वी दाखल झालेले पाणी पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे वाहून गेले होते. त्यामुळे सिद्धेश्वर येथून हे पाणी पुन्हा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. महानगरपालिकेने ही बाब जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार १५ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना पत्र पाठवून वाहून गेलेल्या १ दलघमी पाण्याची मागणी केली. मात्र या विभागाने पाणीसाठा उपलब्ध नाही, असे कारण देऊन असमर्थता दर्शविली.
निम्न दुधनाकडेही पाठपुरावा
पाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून राहटी बंधाºयासाठी पाणी घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकाºयांकडे तशी मागणी नोंदविली. जिल्हाधिकाºयांनीही औरंगाबाद येथे या संदर्भात पत्र व्यवहार केल्याचे सांगण्यात आले.परंतु, राहटी बंधाºयातील पाणी संपले तरीही पर्यायी व्यवस्था झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परभणीकरांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पाणीप्रश्नाकडे डोळेझाक
शहरामध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासही मनपा प्रशासन कमी पडत आहे. अशी परिस्थिती असताना घरपट्टी, पाणीपट्टी दरवाढ केली जात आहे. एकीकडे सुविधा नाहीत, तर दुसरीकडे दरवाढ होत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. शहरासाठी पाणी उपलब्ध करणे ही मनपा प्रशासनाची जबाबदारी आहे; परंतु, प्रशासनाने पाणीप्रश्नाकडे डोळेझाक केल्याचे दिसत आहे. महापालिकेने शहरासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पत्र व्यवहार केला ही असेल. परंतु, मनपाचा पाठपुरावा कमी पडल्यानेच शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत.

Web Title: The scarcity to be settled for Parbhanikar: The water in the living room is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.